घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशिवजन्मोत्सव मिरवणुकीत बाऊन्सर्सचा प्रताप; 'या' कारणाने सापडले पोलिसांच्या जाळ्यात

शिवजन्मोत्सव मिरवणुकीत बाऊन्सर्सचा प्रताप; ‘या’ कारणाने सापडले पोलिसांच्या जाळ्यात

Subscribe

नाशिक : शहरासह जिल्ह्याभरात शिवजन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि धुमधडाक्यात साजरा झाला. मात्र, याच दरम्यान दोघा खाजगी सिक्युरिटी एजन्सीच्या बाऊन्सर्सनी महाप्रताप केल्याने त्यांच्यावर पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारला आहे. शिवजन्मोत्सव सोहळ्या प्रसंगी निघालेल्या मिरवणुकीत अनेक मंडळांनी खाजगी बाऊन्सर्सची नेमणूक केली होती. त्यातील दोघांनी बेकायदा पद्धतीने एअरगन बाळगल्या प्रकरणी नाशिक पोलीस गुन्हे विभागाच्या युनिट १ कडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या मिरवणुकीत दोघा बाऊन्सर्सनी बेकायदा एअरगन बाळगल्याचे पोलिसांना लक्षात येताच त्या प्रकरणी सिक्यूरिटी एजन्सीच्या संचालकांसह दोघा बाऊन्सर्स विरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिक्युरिटी एजन्सीचा संचालक फिरोज नुरमोहम्मद खान (३१ रा.अरिंगळे मळा,सिन्नरफाटा) याच्या सह रौफ मौला शेख (४० रा.वडाळागाव) व राजू शफिक शेख (३१ रा.अरिंगळे मळा,सिन्नरफाटा) या दोघा बाऊन्सर्स विरोधात विनापरवानगी बेकायदा एअरगन बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय

- Advertisement -

दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ चे कर्मचारी प्रदिप म्हसदे यांनी तक्रार दाखल केली आहे. रविवारी सर्वत्र शिवजन्मोत्सव सोहळ्याचा उत्साह सुरू असतांना सायंकाळच्या सुमारास वाकडी बारव भागात एका मंडळाच्या अध्यक्षाचे सिक्युरिटी गार्ड विनापरवाना बेकायदेशीर एअरगन बाळगून असल्याचे पथकास आढळून आले. पोलिस चौकशी दोघा संशयिताकडे एअरगन बाळगण्याबाबत कुठल्याही प्रकारचा परवानी नसल्याचे निष्पन्न झाल्याने सिक्युरिटी एजन्सीचे संचालक फिरोज खान यांच्यासह दोघा बाऊन्सरांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक म्हसदे करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -