घरमहाराष्ट्रनाशिकव्हर्च्युअल सहलीतून विद्यार्थ्यांनी अनुभवली धमाल

व्हर्च्युअल सहलीतून विद्यार्थ्यांनी अनुभवली धमाल

Subscribe

विद्यार्थ्यांनी स्नॅक्स आणि गाण्यांचाही आनंद लुटला

कोरोना संकटामुळे गेल्या दीड वर्षांपासून घरात राहून विद्यार्थी कंटाळले आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा ताजेतवाने वाटावे, यासाठी शहरातील दिल्ली पब्लिक स्कूलच्या वतीने अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात विद्यार्थ्यांनी घरात राहून मुंबईतील प्राणी संग्रहालयात व्हर्च्युअल सहलीद्वारे आनंददायी भटकंतीचा आनंद घेतला.

जागतिक सहल दिनानिमित्त १८ जून रोजी दिल्ली पब्लिक स्कूलने हा उपक्रम घेतला. कोरोना संसर्गाच्या संकटामुळे मुलांना प्रत्यक्ष घराबाहेर जाता येत नाही. त्यातच सार्वजनिक ठिकाणी गेल्यास संसर्गाचा धोका असतो, त्यामुळे पालक विद्यार्थ्यांना घराबाहेर पडू देत नाहीत आणि विद्यार्थीदेखील बाहेर जात नाहीत. त्यातच शाळा केवळ ऑनलाईन पद्धतीने सुरू असल्याने विद्यार्थी रोजच्या दिनचर्येला कंटाळले आहेत. अशा वातावरणात शाळेच्या वतीने आयोजित केलेला हा उपक्रम अत्यंत उत्साहवर्धक ठरला.

- Advertisement -

व्हर्च्युअल सहलीमुळे विद्यार्थ्यांना घरातूनच प्राणी संग्रहालयाची सफर करण्याचा आनंद मिळाला. या उपक्रमाची खासियत म्हणजे सहलीला जाताना ज्याप्रमाणे विद्यार्थी खाण्यापिण्याच्या वस्तू सोबत घेतात, त्याचप्रमाणे या उपक्रमातही घेतल्या होत्या. संस्थेचे संचालक सिद्धार्थ राजघरिया आणि प्राचार्या डॉ. पुष्पी दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्राण्यांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी स्नॅक्स आणि गाण्यांचाही आनंद लुटला. यातून वेगळी अनुभूती घेतली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -