घरमहाराष्ट्रनाशिकशहरात वाढलाय चोरट्यांचा सुळसुळाट

शहरात वाढलाय चोरट्यांचा सुळसुळाट

Subscribe

मोबाईल हिसकावणार्‍या तिघांना अटक

शहरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट झाला असून, वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी पोत आणि मोबाईल हिसकाल्याचे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पंचवटी व नाशिकरोड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मोबाईल हिसकावणार्‍या तिघांना नाशिकरोड पोलिसांनी पकडले असून त्यापैकी एक अल्पवयीन संशयित आहे.

पहिल्या घटनेत, हिरावाडीतील बेबी भिवसिंग राठोड या शनिवारी (दि.२१) दुपारी हिरावाडीतील पाटाजवळून पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी राठोड यांची पोत ओरबाडून नेली. दुसर्‍या घटनेत, राजस्थान येथील संतोषकुमार अर्जुनकुमार मीणा शुक्रवारी (दि.२०) रात्री साडे नऊच्या सुमारास नाशिकरोड येथील हॉटेल परिवारजवळ उभे होेते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांना स्वस्तात लॉज मिळवून देतो असे आमिष दाखवून दुचाकीवर बसवले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना धमकी देत मोबाईल बळजबरीने काढून घेत पसार झाले. पोलिसांनी तपास करून संशयित नदीम सलीम बेग (२२), दीपक अशोक पताडे (१९, रा. विहीतगाव) यांना अटक केली असून १६ वर्षीय संशयितास ताब्यात घेतले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -