घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रवाढत्या गुन्हेगारीवर कोम्बिंग ऑपरेशनची मात्रा; ९० जणांना घेतले ताब्यात

वाढत्या गुन्हेगारीवर कोम्बिंग ऑपरेशनची मात्रा; ९० जणांना घेतले ताब्यात

Subscribe

नाशिक : शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यास पोलिसांना आलेले अपयश बघता पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून सोमवारी (दि.२८) रात्री ११ ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत १९ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये ९० गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले, तर २९ टवाळखोर आणि अजामिनपत्र वॉरंटमधील ११ जणांवर कारवाई करण्यात आली.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नाशिक शहरातील शरीराविरुद्ध व मालाविरुद्ध गुन्हे करणार्‍या सराईत गुन्हेगार व समाजात दहशत निर्माण करणार्‍या गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी चार सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त व १३ पोलीस ठाण्यांमधील पोलीस अधिकार्‍यांनी सोमवारी (दि.२७) रात्री ११ वाजेपासून मध्यरात्री २ वाजेपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन केले.

- Advertisement -

पोलीस ठाणे निहाय रेकॉर्डवरील, शरीराविरुद्धचे, मालाविरुद्धचे व दहशत पसरविणारे गुन्हेगार, हिस्ट्रीशिटर, सराईत गुन्हेगार, तडीपार, पाहिजे असलेले गुन्हेगार, टवाळखोर, वॉरंटमधील पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेवून कारवाई करण्यासाठी पोलीस ठाणेनिहाय गुन्हेगारांचा रहिवास १३ पोलीस ठाणे हद्दीतील १९ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवून कारवाई करण्यात आली. यामध्ये रेकॉर्डवरील, सराईत गुन्हेगार, हिस्ट्रीशीटर असे एकूण १५७ गुन्हेगारांची तपासणी केली असता ९० गुन्हेगार मिळून आले. शहरातून हद्दपार केलेल्या ३६ जणांची तपासणी केली असता ते घरी मिळून आले नाहीत. महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार २९ टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली. अजामिनपत्र वॉरंटमधील ११ जणांवर कारवाई करण्यात आली. भारतीय हत्यार कायद्याचे उल्लंघन करणार्‍या एकाविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली.

कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सहभागी झालेले पोलीस

कोम्बिंग ऑपरेशनमध्ये तीन पोलीस उपायुक्त, चार सहायक पोलीस आयुक्त, ४२ पोलीस अधिकारी, २३६ पोलीस अंमलदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह गुन्हे शाखा युनिट एक व दोनचे प्रभारी अधिकारी, गुन्हे शाखा युनिटकडील अधिकारी व अंमलदार आदी सहभागी झाले होते.

नाशिक शहरात वेळोवेळी कोम्बिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. : अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -