घरमहाराष्ट्रनाशिकवन्यजीव उपचार केंद्र म्हणजे सृष्टी जगवण्याचे पाऊल

वन्यजीव उपचार केंद्र म्हणजे सृष्टी जगवण्याचे पाऊल

Subscribe

पालकमंत्री छगन भुजबळ : जागतिक वन्यजीव सप्ताहानिमित्त भूमिपूजन

नाशिक : वन्यप्राण्यांसाठी सुसज्ज असे रुग्णालय नाशकात साकारले जात आहे, याचा आनंद आहे. हे उत्तर महाराष्ट्रातील वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणार आहे. जसा माणसांचा जीव तसा वन्यप्राण्यांचाही जीव महत्त्वाचा आहे. वन्यप्राणी, पक्षी, कीटक हे सर्व जैवविविधतेमधील घटक सृष्टीचा एक भाग आहे. त्यामुळे पृथ्वी टिकविण्यासाठी सृष्टी जगविणे महत्त्वाचे असून, हे त्याच्याच दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

जागतिक वन्यजीव सप्ताहानिमित्त सोमवारी (दि.४) पहिले वन्यजीव उपचार केंद्राच्या  (ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर) बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते  करण्यात आले. यावेळी भुजबळ यांनी वनविभागाने प्रदर्शित केलेल्या रेस्क्यू साधनसामुग्रीची माहिती वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांच्याकडून जाणून घेतली. उत्तर महाराष्ट्रातील पहिले वन्यप्राणी उपचार केंद्र (ट्रान्सिट ट्रीटमेंट सेंटर) नाशिक पश्चिम वनविभागाच्या वतीने जिल्हा नियोजन समितीने पुरविलेल्या निधीद्वारे म्हसरुळ शिवारातील वन विभागाच्या आगारात सुमारे दोन एकर जागेत उपचार केंद्र उभारले जाणार आहे.

- Advertisement -

पालकमंत्री भुजबळ म्हणाले, जखमी वन्यप्राण्यांची शुश्रुषा करणे संकटात सापडलेल्या वन्यजीवांना आपला जीव धोक्यात घालून रेस्क्यू’ करणे, वणवे रोखणे, जंगलातील तस्करी रोखणे, असे सर्व काम वनखात्याकडून केले जाते. हे धोकादायक व जोखमीचे आणि तितकेच जबाबदारीचे काम आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर, उपवनसंरक्षक पंकज गर्ग, तुषार चव्हाण, कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, सहायक वनसंरक्षक गणेश झोळे, भरत शिंदे, आनंद रेड्डी, ठेकेदार मंदार ठाकूर आदी उपस्थित होते. पंकज गर्ग यांनी प्रास्ताविक केले.

- Advertisement -

असा असेल प्रकल्प

या केंद्रात निरीक्षण, ऑपरेशन थिएटर, आयसीयू, शवविच्छेदन, एक्स-रे असे स्वतंत्र कक्ष असतील. मेडिकल अँड फूड स्टोअरेज, उपचार व बचाव साहित्यासाठी कक्ष असतील. मृत वन्यजीवांच्या अंत्यसंस्कारासाठी स्वतंत्र व्यवस्था असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -