घरमहाराष्ट्रनाशिकउद्यानाची देखभाल करणाऱ्या 'यमुना' ठरल्या स्वच्छता दूत

उद्यानाची देखभाल करणाऱ्या ‘यमुना’ ठरल्या स्वच्छता दूत

Subscribe

सिन्नर : दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व स्वच्छ भारत अभियान व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कृती संगमांतर्गत सिन्नर नगर परिषदेच्या महिला व्यवस्थापन प्रकल्प येथील गार्डनचे देखभाल, दुरुस्तीचे कार्य करणार्‍या केशवा महिला बचत गटातील यमुना सानप यांची स्वच्छता दूत म्हणून महाराष्ट्र शासनाद्वारे 2 दिवसीय अभ्यास दौर्‍यासाठी निवड झाली आहे.

केंद्रिय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय भारत सरकार यांचेद्वारे दि. 7 ते दि. 30 या कालावधीत महिलांचा स्वच्छतेमधील सहभाग व स्वच्छतेमधील नेतृत्व वृद्धिंगत करण्यासाठी “स्वछोत्सव 2023″चे आयोजन करण्यात आले आहे. स्वच्छ भारत अभियान व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कार्याची देवाण-घेवाण राज्यांतर्गत व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्यातील 20 महिलांची स्वच्छता दूत म्हणून निवड करण्यात आली आहे.

- Advertisement -

स्वच्छता महोत्सव 2023 अंतर्गत दि.27 व दि. 28 रोजी एक पथक गुजरातमधील अहमदाबाद शहर व दुसरे पथक मध्यप्रदेशातील इंदोर शहर याठिकाणी अभ्यास दौर्‍यावर रवाना होणार आहे. राज्यातील 20 महिलांमध्ये सिन्नर नगरपरिषदेतील केशवा बचत गटाच्या यमुना सानप यांची निवड झाल्यामुळे मुख्याधिकारी संजय केदार, आरोग्य निरीक्षक रवींद्र देशमुख व शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव यांनी अभिनंदन केले. दोन दिवसीय अभ्यास दौर्‍यासाठी सिन्नर नगरपरिषदेच्या माध्यमातून राज्यातील 20 महिलांमध्ये स्वच्छता दूत म्हणून निवड झाल्याबद्दल यमुना सानप यांनी ही निवड माझ्यासाठी खूप आनंद देणारी आहे, मला खूप आनंद झाला आहे. नगरपरिषदेच्या मैला व्यवस्थापन प्रकल्प येथे आमच्या केशवा बचत गटाच्या रेखा ससले, लक्ष्मीबाई जाधव, सोन्याबाई ठोंबरे यांची दैनंदिन कामकाजात साथ मिळाली. त्यांच्यामुळे माझी निवड झाली असून मुख्याधिकारी केदार, देशमुख व जाधव यांचे मी धन्यवाद मानते असे म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -