घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमहिंद्रा कंपनीत चोरी; कामगारांनीच केले ३०० पार्ट्स लंपास

महिंद्रा कंपनीत चोरी; कामगारांनीच केले ३०० पार्ट्स लंपास

Subscribe

तिघांना अटक; सातपूरमधील भंगार विक्रेत्याला विकलेले पार्ट जप्त

नाशिक : सातपूर येथील एमआयडीसीतील महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीच्या सीकेडी प्लॉट क्रमांक ८१ येथून व्हेरिटो कारच्या इंजिनचे साडेचार लाख रुपयांचे ३०० फ्युएल इंजेक्टर पार्टस चोरणार्‍यांना तीन कामगारांना नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सापळा रचून अटक केली. संशयित तिघेजण महिंद्रा कंपनीत कॉन्ट्रक्ट बेसवर काम करणारे कर्मचारी असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. शिवाय, तिघांनी १० ते १२ दिवसांमध्ये फ्युअल इंजेक्टर पार्टस चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. न्यायालयाने तिघांना ८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

गजानन रामभाऊ भालेराव (वय २९, रा.प्रबुद्धनगर, सातपूर), सिद्धार्थ उमाजी नरवडे (२९), आकाश बाळू साळवे (२६, रा. महिरावणी, ता.जि.नाशिक) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. चोरट्यांनी सातपूर एमआयडीसीतील महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीच्या सीकेडी प्लॉट क्रमांक ८१ येथून व्हेरिटो कारच्या इंजिनचे साडेचार लाख रुपयांचे जवळपास ३०० फ्युएल इंजेक्टर पार्टस १५ जुलै ते ५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत लंपास प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी महिंद्रा कंपनीच्या सीकेडी प्लॉटचे व्यवस्थापक प्रभाकर नारायण जाधव यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सातपूर पोलीस आणि नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकने समांतर तपास सुरु केला.

- Advertisement -

गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस नाईक प्रशांत मरकड यांना पार्टस चोरणार्‍या आरोपींचा ठावठिकाणा समजला. त्यानुसार त्यांनी गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना आरोपींबाबत माहिती दिली. ढमाळ यांनी तात्काळ संशयितांना ताब्यात घेण्यासाठी सहायक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागूल, प्रवीण वाघमारे, शरद सोनवणे, नाझीम पठाण, प्रदिप म्हसदे, प्रशांत मरकड, विशाल देवरे, महेश साळुंके यांना रवाना केले. पथकाने सापळा रचत तिघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवत तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली. तिघांनी पार्टस अंबड लिंक रोडवरील भंगार विक्रेता अताउल्ला समशुल्ला खान (वय ४६, रा. मिल्लतनगर, वडाळा, नाशिक) यांना विक्री केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी खान यांच्याकडून ३०० फ्युअल इंजेक्टर पार्टस जप्त केले. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागूल करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -