घरमहाराष्ट्रनाशिकमनमाड क्रॉसिंग गेटचे पाईपच नेले चोरून

मनमाड क्रॉसिंग गेटचे पाईपच नेले चोरून

Subscribe

रेल्वे प्रशासनाकडून लपवाछपवीचा प्रयत्न, श्वान पथकाकडून पाहणी

मनमाड येथील रेल्वे वर्कशॉपला खेटून जाणार्‍या मनमाड-औरंगाबाद रेल्वे मार्गावर असलेल्या क्रॉसिंग गेटच्या एका बाजूचे मोठे लोखंडी पाईप अज्ञात चोरट्यांनी कापून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली. या बाबत रेल्वेचे अधिकारी कमालीची गुप्तता पाळत असून असा काही प्रकार घडलाच नसल्याचे सांगतात, तर दुसरीकडे एका बाजूचे पाईप गायब असल्याचे स्पष्ट दिसत आहे. शिवाय हा प्रकार समोर आल्यानंतर आरपीएफने घटनास्थळी श्वानपथक आणून हा संपूर्ण परिसर पिंजून काढल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे रेल्वेचे अधिकारी हा सर्व प्रकार दाबण्याचा का प्रयत्न करीत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

गर्डर शॉप भागातून मनमाड-औरंगाबाद रेल्वे मार्ग जातो. याच भागात रेल्वेचा ब्रिटीश कालीन केंद्रीय कारखाना आहे. त्यात रेल्वेचे पूल तयार करण्यासाठी लागणारे गर्डर, नट-बोल्ट यासह इतर साहित्यांचे उत्पादन केले जाते. या कारखान्यात शेकडो रेल्वे कामगार काम करतात. हा कारखाना रेल्वे रुळाच्या दुसर्‍या बाजूला असल्यामुळे कामगारांना हा रूळ ओलांडून कारखान्यात जावे लागत होते. शिवाय या भागात असलेल्या वसाहतीतील नागरिकदेखील रूळ ओलांडून जात असल्याचे पाहून त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊन नये यासाठी रेल्वे प्रशानातर्फे रुळावर क्रॉसिंग गेट उभारून दोन्ही बाजूंला लोखंडी पाईप लावण्यात आले होते. गाडी या रुळावरून गाडी जाण्याच्या व येण्याच्या अगोदर गेट बंद करण्यात येत होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी रेल्वे प्रशानाने भूयारी मार्ग तयार केला, त्यामुळे आता कारखान्यात जाण्या-येण्यासाठी कामगारांसोबत या भागातील नागरिक या भूयारी मार्गाचा वापर करतात.

- Advertisement -

भुयारी मार्ग करण्यात आल्यामुळे रुळावरील क्रॉसिंग गेट बंद करण्यात आले होते. मात्र, त्याला दोन्ही बाजूंला असलेली मोठी लोखंडी पाईप तशीच होती. लोखंड चोरांची नजर या पाईपावर पडली आणि त्यांनी एका बाजूचे पाईप कापून नेले. चोरट्यांनी पाईप कापून नेल्याची माहिती मिळताच रेल्वे अधिकार्‍यांची तारांबळ उडाली. प्रकरण गंभीर असल्यामुळे याची चौकशी होईल म्हणून आम्हीच ते पाईप काढून ठेवल्याचे अधिकारी सांगतात. मात्र, पाईप काढून ठेवायचेच होते तर मग एकाच बाजूचे का काढले ? दुसर्‍या बाजूचे पाईप तसेच का ठेवले शिवाय पाईप चोरीला गेले नाही, तर ‘आरपीएफ’ ने श्वानपथक आणून संपूर्ण परिसर पिंजून का काढला, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -