घरCORONA UPDATEपीपीई किट्स घालून श्रीगुरुजी रुग्णालयात रेमडेसिवीरची चोरी

पीपीई किट्स घालून श्रीगुरुजी रुग्णालयात रेमडेसिवीरची चोरी

Subscribe

मुख्य आरोपीसह ओटी मदतणीस, वॉर्ड बॉयला अटक

कोरोना रुग्णांसाठी प्रभावी असलेल्या दोन रेमडेसिवीर इंजेक्शनची गंगापूर रोडवरील श्रीगुरुजी रुग्णालयातून पीपीई किट्स घालून चोरी करणार्‍या तीन जणांना गंगापूर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून रुग्णाच्या नावे असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचे काचेच्या सीलबंद बॉटलचे दोन बॉक्स जप्त केला. विशेष म्हणजे, चोरट्यांमध्ये रुग्णालयातील ओटी मदतणीस आणि वॉर्ड बॉयचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.
मुख्य आरोपी विकी वरखडे, ओटी मदतणीस सागर सुनील मुटेकर, वॉर्ड बॉय गणेश गंगाधर बत्तीसे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

१७ एप्रिल रोजी रात्री ९.४२ वाजता गंगापूर रोडवरील श्रीगुरुजी रुग्णालयातील तिसर्‍या मजल्यावरच्या कोविड वॉर्डमध्ये एक कोरोनाबाधित रुग्ण उपचारार्थ दाखल झाला. त्यास रेमडेसिवीर इंजेक्शनचा पहिला डोस देण्यासाठी दोन रेमडेसिवीर इंजेक्शन नर्सिंग काऊटरवर औषधांच्या बॉक्समध्ये ठेवला होता. त्याचवेळी अनोळखी दोनजण पीपीई किट्स घालून तिसर्‍या मजल्यावर आले. त्यातील एकाने कोरोना वॉर्डात प्रवेश करुन नर्सिंग काऊंटरवरच्या औषधांच्या बॉक्समधील दोन रेमडेसिवीर लंपास केले. याप्रकरणी रुग्णालयाच्या प्रशासन अधिकारी पूनम बेलगावकर यांनी सीसीटीव्हीची पाहणी करुन पीपीटी किट्स घालून रुग्णालयातील कर्मचार्‍याने चोरी केल्याची तक्रार गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला. पोलीस तपासात मुख्य आरोपी विकी वरखडे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला अटक करत त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला. पोलीस चौकशीत त्याने दोन साथीदारांसोबत चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी मुटेकर व गणेश बत्तीसे यांनाही अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -