घरमहाराष्ट्रनाशिकऐन दुष्काळात गंगापूर धरणातले पाणी मुरतेय कुठे?

ऐन दुष्काळात गंगापूर धरणातले पाणी मुरतेय कुठे?

Subscribe

गंगापूर धरणातून आजघडीला उरल्यासुरल्या पाण्याचीही चोरी होत असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस येत आहे.

राम खुर्दळ, गिरणारे

सध्या कमी पर्जन्यमान व बेसुमार वाढलेल्या उष्णतेमुळे गंगापूर धरणाचा पाणीसाठा २७ टक्क्यांहून कमी आहे. परंतु, नाशिक शहर, जिल्हा व जिल्ह्याबाहेरही पाणीपुरवठा होत असलेल्या गंगापूर धरणातून आजघडीला उरल्यासुरल्या पाण्याचीही चोरी होत असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस येत आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रकाराबाबत जिल्हा प्रशासन मात्र अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

- Advertisement -

यंदा भीषण दुष्काळ आहे, शेतीला पाणी नाही की पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. जिल्हा प्रशासनाने पाणी जपून वापरा,तसेच धरणातील उरल्यासुरल्या पाण्याची जपवणूक करा.पाण्याची चोरी रोखा म्हणून सक्त आदेश दिेले आहे. नाशिकसारख्या शहराला पिण्याचे पाणी पुरवणारे एकमेव धरण असलेल्या गंगापूर धरणातून मात्र अनेक छुप्या मार्गाने उरल्यासुरल्या पाण्याची विल्हेवाट लावली जात असल्याचे आढळून आले आहे. ऐन दुष्काळी परिस्थितीत काही खासगी संस्था व भांडवलदार मंडळी ही ही धरणातून पाईपलाईन टाकून पाणी नेत आहे.सध्या सर्वत्र पाणी कपात केली जात आहे, भविष्यात पाण्याची अधिक तीव्र टंचाई भासू नये म्हणून पाण्याचे जपून नियोजन करण्याचे जिल्हा प्रशासनाचे धोरण असताना संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळ मात्र ऐन टंचाईत गंगापूर धरणाच्या पाण्याला ग्रहण लागल्याची स्थिती आहे. यात वीज महावितरणच्या बेपर्वाईमुळे धरणात जोडलेले विजपंप त्यासाठी लांबच लांब धरणाच्या मोकळ्या जागांवर पसरलेल्या उच्च दाबाच्या विद्युत केबल्समुळेही परिसर धोकादायक बनला आहे. दरम्यान गंगापूर धरणाची जिल्हा प्रशासनाने पाहणी करून धरणाचे उरलेसुरले पाणी जपून वापरण्याची नितांत गरज आहे.

यंदा दुष्काळी स्थितीमुळे कित्येक गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आटल्या असून जलाशये धरणे कोरडीठाक पडली आहेत. त्यात ४० डिग्रीपेक्षा अधिक तापमानाचा पारा असल्याने धरणातील उरलेसुरले पाणीही बाष्पीभवनात गेले तर बाकीचे मुरले गेले. अशातच नाशिकसह जिल्हा व जिल्ह्याबाहेर शेतीसाठी असलेल्या मुख्य गंगापूर धरणातील पाण्याचे संरक्षण आवश्यक आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने आपली कार्यालये सोडून वस्तुस्थिती जाणण्याची गरज असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया काही जागरूक नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

- Advertisement -

पर्यटनाच्या नावाखाली बेसुमार बांधकामे

हरित लवादाचे स्पष्ट आदेश असताना धरण व नदीपात्रात सिमेंटचे बांधकामे नको, मात्र जिल्ह्यातील प्रमुख धरण असलेल्या गंगापूर धरणाच्या पाणी क्षेत्रात सिमेंटच्या इमारती, पर्यटनाच्या नावाखाली बेसुमार बांधकामे सुरू आहेत. सध्या भीषण दुष्काळात धरणाचे पाणी वाचवून भविष्यातील पाणी नियोजनाची जबाबदारी महत्त्वाची असताना पाटबंधारे खात्याच्या बेपर्वाईमुळे धरणातील पाणीही असुरक्षित आहे. भविष्यात तीव्र पाणीटंचाई झाल्यास त्याला प्रशासनच जबाबदार राहील. अशा ढिस्साळ यंत्रणेवरच कार्यवाही होणे गरजेचे आहे. – निशिकांत पगारे, गोदावरी स्वच्छता अभियान

पाणीचोरांवर गुन्हे दाखल करू

पाणी चोरी करणार्‍यांवर जलसंपदा विभाग कठोर कारवाई करेल. या संदर्भात महावितरणाला पत्र दिले असून प्रथमत: अनधिकृत मोटारींच्या वीज जोडण्या खंडीत करण्यात येतील. तसेच, पाणीचोरी करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. – सुभाष मिसाळ, शाखा अभियंता, जलसंपदा विभाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -