पिंपळगाव बसवंत शहरात वाढल्या चोर्‍या

किराणा कटलरी असोसिएशनच्या वतीने पोलिसांना निवेदन

thefts increased in pimplgaon

शहरामध्ये वाढत असलेल्या चोरीच्या घटना लक्षात घेता किराणा कटलरी असोसिएशनच्या वतीने पिंपळगावचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पठारे यांना निवेदन देण्यात आले.

पोलिसांना दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, पिंपळगाव परिसरात मोठ्या प्रमाणात भुरट्या चोरीचे प्रकार वाढले असून याचा मोठा शहरातील व्यावसायिक वर्गाला बसत आहे प्रामुख्याने किराणा आणि कटलरी व्यवसायिक त्यांचे देखील मोठे नुकसान या चोर्‍यांमध्ये झाले आहे शहरातील अनेक ठिकाणी दिवसाढवळ्या असे प्रकार घडतात तरी संबंधित प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी व्यापारी वर्गाने केली आहे. या निवेदनावर निवेदन देताना असोसिएशनचे अध्यक्ष श्यामलाल बोरा, सेक्रेटरी संदीप कागदे, संचालक संतोष पिपाडा, संदेश सोळंकी, शितल धाडीवाल, प्रवीण भाऊ वाळेकर, अशोक शेठ भटेवरा, राहुल बागरेचा, समीर शहा, राकेश सुराणा, संजय कायस्थ, संजय बाफना यांच्या सह्या आहेत.