घरक्राइम१६ तोळे सोन्यासह ३ लाखांवर डल्ला

१६ तोळे सोन्यासह ३ लाखांवर डल्ला

Subscribe

४ लाख ५८ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरुन नेत पोबारा

लासलगाव येथील अहिल्याबाई होळकर किल्ल्याच्या पाठीमागील भागात पहाटे सव्वादोन वाजेच्या दरम्यान अज्ञात सहा चोरट्यांनी चोरीच्या उदेशाने येथील सर्व घरांची पाहणी करत येथील राम मंदिर ट्रस्टी विष्णू निकम यांच्या घरी घरफोडी केल्याची घटना घडली आहे विष्णू निकम आणि मुलगा संदीप आपल्या पत्नी समवेत वेगवेगळ्या रुममध्ये झोपले असताना अज्ञात धारदार शस्त्र असलेले सहा चोरट्यांनी जाळीचे गेट वाकवून घराचा कडीकोंडा कापून घरात प्रवेश केला.

हॉलमधील शोकेस व बाजूचे लाकडी कपातमधील कप्पे तोडून त्यातील १५८ ग्रॅम वजन असलेले सोन्याची दागिने तसेच पोस्टाचे आरडी कलेक्शनची रक्कम व स्वताचे असे अंदाजे ३ लाख रुपये रोख रुक्कम असा एकूण ४ लाख ५८ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरुन नेत पोबारा केला. पहाटे विष्णू निकम उठले असतात एवढ्या पहाटे घराचे दार कोणी उघडले म्हणून पाहणी करण्यासाठी खाली आले असता आपल्या घरात चोरी झाल्याचे समजताच आरडाओरडा केल्याने मुलगा संदीप उठला तसेच शेजारील धावपळ करत आले असता जबरी चोरी झाल्याचे समजले.

- Advertisement -

या चोरीची माहिती लासलगाव पोलिसांना समजताच निफाडचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे व कर्मचारी घटनास्थळी दाखल होत वरिष्ठांना माहिती दिली. श्वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. मात्र पाहिजे तसा काही फायदा झाला नसल्याचे दिसून आले. चोरीची माहिती गावात पसरताच बघ्यांनी मोठी गर्दी केली. मात्र यावेळी बघ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असून आपण सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा उडवत विना मास्क असल्याचे विसर पडल्याचे चित्र पहावयास मिळाले.

हे अज्ञात सहा चोर चोरी करण्यासाठी घराची पाहणी करत होते त्यावेळी जवळच असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेर्‍यात अज्ञात धारदार शस्त्र असलेले सहा चोरटे कैद झाले.याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या मदतीने तपास सुरु केला या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात दिसत असलेले हे चोरटे आपल्या लक्ष आले अथवा दिसल्यास लासलगाव पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन लासलगाव पोलिसांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -