Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र नाशिक चोरट्यांनी दागिन्यांसोबतच पूजेचे साहित्यही लांबवले

चोरट्यांनी दागिन्यांसोबतच पूजेचे साहित्यही लांबवले

घरमालकाला रत्नागिरीला जाणे पडले महागात

Related Story

- Advertisement -

दाट लोकवस्ती व अरुंद रस्ते असलेल्या आणि शहरातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळख असलेल्या नाव दरवाजा परिसरातील तीन मजली जुन्या वाड्यात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घरफोडी केली. चोरट्यांनी ९ लाख ३३ हजारांचे सोन्याचे दागिने, पुजेचे साहित्य आणि प्लबिंग साहित्य ४७ हजार रुपये असा एकूण 9 लाख 81 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नाशिक शहरात घरफोडी, वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली. वाढत्या घटनांमुळे नागरिकांसह वाहनचाकांमध्ये भीती व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकजण कामानिमित्त बाहेरगावी जात आहे. बंगले व फ्लॅटमध्ये कोणी नसल्याची संधी साधत चोरटे घरफोडी करत आहेत. वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे शहर पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांनी दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी चोरी केल्याने नागरिकांमध्येही भीती व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

पोलिसांच्या माहितीनुसार, नाव दरवाजा परिसरातील तीन मजली जुन्या वाड्याचे मालक किर्तीकुमार औरंगाबदकर हे योगशिक्षक आहेत. ते काही दिवसांपुर्वी रत्नागिरीला गेले. वाड्यात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी बुधवारी (दि.९) रात्री घरात प्रवेश केला. चोरट्यांनी सोन्याचे दागिने, पुजेचे साहित्य आणि प्लबिंग साहित्य असा एकूण 9 लाख 81 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. गुरुवारी (दि.१०) वाड्यात चोरी झाल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना, भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोनवणे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी भेट देत पाहणी केली. याप्रकरणी औरंगाबादकर मंदार वडनेर यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

- Advertisement -