Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र नाशिक दुष्काळात तेरावा महिना; गिरणा उजवा कालवा फुटला, पाणीप्रश्न अधिक गंभीर

दुष्काळात तेरावा महिना; गिरणा उजवा कालवा फुटला, पाणीप्रश्न अधिक गंभीर

Subscribe

नाशिक : देवळा तालुक्याचा पूर्व भाग आणि मालेगाव तालुक्यात अत्यंत दुष्काळी परिस्थिति असताना गिरणा उजव्या कालव्याद्वारे ह्या भागातील जनतेची तृष्णा भागेल अशी अपेक्षा असतानाच चिंचवड शिवारात एकोणिसाव्या किलोमीटरला भाऊराव सुकदेव सावंत यांच्या घराजवळ सदर कालवा फुटलाने गिरणा नदीला पाणी सुरू असूनसुद्धा ह्या भागाला वेळेवर पाणी मिळणे मुश्किल झाले आहे.

सदर कालवा फुटीमुळे सावंत यांच्या कांदा चाळीत देखील पाणी घुसले असून काही कांदे शेतात वाहून गेले आहेत. अपुरा कर्मचारी वर्ग व अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षामुळे कालवा फुटला असल्याची चर्चा दबक्या आवाजात कालवा परिसरातील शेतकर्‍यांत सुरु आहे. वास्तविक उन्हाळ्यात कालवा देखभाल व दुरुस्ती होणे गरजेचे आहे. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या मतदार संघात ह्या कालव्याचे पाणी जाते तरीही कालव्याची वहनक्षमता वाढविणे किंवा दुरुस्ती करणे याकडे खुद्द पालकमंत्रीही दुर्लक्ष करतात की पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर त्यांचा वचक राहिला नाही याबाबत उलटसुलट चर्चा होत आहे. कालवा वहनक्षमतेपेक्षा जास्त चालविला म्हणून फुटला की जीर्ण झाला म्हणून फुटला जर जीर्ण झाल्यामुळे फुटला असेल तर कालव्याकडे नक्कीच संबंधित विभाग दुर्लक्ष करताहेत हेच सिद्ध होते. मेशी शिवारात गट नं.१६६ शेजारी देखील कालवा फुटण्याचा धोका

- Advertisement -

मोठा पाऊस आला तर मेशी शिवारातील गट नं. १६६ जवळ देखील कालवा फुटण्याची शक्यता असून पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांकडे याबाबत संबंधित शेतकर्‍यांनी तक्रारी अनेकदा केल्या आहेत परंतु संबंधित अधिकार्‍यांनी सदर जागेच्या पाहणी व्यतिरिक्त कहिहि केले नाही. स्थानिक शेतकर्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी कालवा फुटला आहे त्या ठिकाणापासून जवळच कालव्यात सिमेंटचे पाईप टाकले असून त्या पाईपांमध्ये घाण अडकल्यानेच कालवा फुटल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्ण उन्हाळाभर एक पोकलॅन मशीन कालवा दुरुस्तीसाठी मिळाले, पण त्या मशिनला वेळेवर डिझेलच उपलब्ध न झाल्याने बर्‍याच वेळा मशीन बंद असायचे. तसेच संबंधित विभागाकडून कालवा दुरुस्तीच्या नावाखाली बिले काढली जातात मग त्याचा उपयोग कशा प्रकारे होतो हे यंत्रणेलाच माहिती असे बोलले जात आहे. दरम्यान मालेगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ढोके, शाखा अभियंता स्वप्निल खैरनार व त्यांचे कर्मचारी सदर ठिकाणी तळ ठोकून असून कालवा दुरुस्तीचे काम मशिनरीच्या सहाय्याने युद्धपातळीवर सुरु असून काम पूर्ण झाल्यावर तात्काळ कालव्याला पाणी सोडण्यात येईल अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून मिळत आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -