घरताज्या घडामोडीयंदा कपात टळली; पण पाणी जपून वापरा

यंदा कपात टळली; पण पाणी जपून वापरा

Subscribe

महापौर सतीश कुलकर्णी यांनी शनिवारी केले जाहीर

शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने यंदाच्या वर्षी पाणी कपात केली जाणार नसल्याचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी शनिवारी (दि. २२) जाहीर केले. गंगापूर धरणातील पाणी साठ्याची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. यंदाची कपात टळली असली तरी नाशिककरांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

महापालिकेच्या वतीने गंगापूर, गौतमी व कश्यपी या समूह धरणांमधून शहरात पाणीपुरवठा केला जात असतो. सध्याची गंगापूर धरणातील पाण्याच्या साठ्याची माहिती घेऊन पाणी कपातीबाबतचा निर्णय महापौरांनी धरणाची पाहणी केली.
त्यांच्या समवेत सभागृहनेते सतीश सोनवणे, अधीक्षक अभियंता संदीप नलावडे, कार्यकारी अभियंता एस एम चव्हाणके, अविनाश धनाईत, पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता सुभाष मिसाळ आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -