घरमहाराष्ट्रनाशिकथोरेंची नियोजनात ‘क्रांती’

थोरेंची नियोजनात ‘क्रांती’

Subscribe

मामांची ‘प्रगती’ फोल

साडेआठ हजार सभासद असलेल्या क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक संस्थेत कोंडाजी आव्हाड, हेमंत धात्रक यांचा वरचष्मा कायम राहील, असे बोलले जात असताना पंढरीनाथ थोरे यांनी केलेल्या सुक्ष्म नियोजनामुळे मामांची ‘प्रगती’ फोल ठरली आहे. अतिआत्मविश्वास, पदाधिकारीपदाचे उमेदवार ठरवताना झालेला प्रादेशिक असमतोल व कोंडाजी आव्हाड-हेमंत धात्रक यांच्यातील सुप्त संघर्षामुळे सत्ताधारी प्रगती पॅनलला पराभवाचा सामना करावा लागला.

‘क्रांतिवीर’च्या एकहाती सत्तेमुळे संस्थेत 25 वर्षे अध्यक्ष वा सरचिटणीसपद भूषवलेले कोंडाजी आव्हाड यांची राजकीय कारकीर्द संपल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यात लौकिक असलेली मविप्र शिक्षण संस्था आणि नाईक शिक्षण संस्थेची एकाच वेळी पायाभरणी झाली. या दोन्ही संस्थांवर सभासदांचा कायमस्वरुपी अंकूश राहावा, याहेतूने प्रत्येक पाच वर्षांनी सभासदांचा कौल आजमावला जातो. नाईक शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत सत्ताधारी प्रगती पॅनलचे नेतृत्व सरचिटणीस हेमंत धात्रक व अध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांच्याकडे राहिले. गेल्या 25 वर्षांपासून संस्थेत कोणत्याना कोणत्या पदावर राहिलेले आव्हाड हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यामुळे सिन्नर विधानसभा मतदारसंघातून त्यांना निवडणूक लढवण्याची मनस्वी इच्छा आहे. तसेच हेमंत धात्रक यांना नाशिक पूर्व मतदारसंघातून भाजपची उमेदवारी हवी आहे. विरोधकांमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांना येवला मतदारसंघ उमेदवारीसाठी खुणावत आहे. त्यामुळे संस्थेतील या तीनही मातब्बर उमेदवारांना येणार्‍या विधानसभा निवडणुकीत आपले नशिब आजमावून बघायचे आहे. त्याची रंगीत तालीम म्हणून यंदा संस्थेची निवडणूक ही विशेषत्वाने राजकीय मार्ग विस्तृत करणारी ठरली. यात कोंडाजी आव्हाड यांचा दारुण पराभव हा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. यानिमित्ताने थोरेंनी आपल्या राजकीय अनुभवाची चुणूक दाखवून दिली. त्यांनी दोन वेळा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले आहे. तसेच त्यांची पत्नी किरण थोरे या दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या आहेत. प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेल्या थोरेंनी 1992 नंतर यंदा प्रथमच नाईक शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत स्वारस्य दाखवले.

- Advertisement -

कोणत्याही स्थितीत कोंडाजी आव्हाड यांच्याच विरोधात उमेदवारी करायची, असा ठाम निर्धार करत थोरेंनी पॅनलमध्ये तुलनेने अपरिचित चेहर्‍यांना उमेदवारीची संधी दिली. यात ज्येष्ठ सभासदांना विश्वस्त पदासाठी लढावे लागल्याने त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मात्र, जुन्या-नवीन उमेदवारांची योग्य सांग़ड घालत थोरेंनी प्रचाराचे सुक्ष्म नियोजन केले. मृत सभासदांच्या वारसांना सभासदत्वाबरोबरच प्रगती पॅनलने अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, सहचिटणीस या प्रमुख पदांसाठी निफाड तालुक्यातून कुणालाही उमेदवारी दिली नाही, या मुद्द्याचा प्रचार करून निफाडची अस्मिता जागवली. यामुळे निफाड तालुक्यातील बहुतांश मतदारांनी एकतर्फी क्रांतिवीर पॅनलला मते दिली. तसेच कोंडाजी आव्हाड व हेमंत धात्रक यांच्यातील सुप्त संघर्षामुळे त्यांच्या पाठिराख्यांनी एकमेकांना मते दिली नसल्याचेही मतमोजणीवेळी स्पष्ट झाले. त्यामुळे क्रांतिवीरने प्रथमत: घेतलेली आघाडी शेवटपर्यंत टिकून राहिली. मात्र, हेमंत धात्रक यांच्या रुपाने अनुभवी सरचिटणीस निवडून देत दिघोळेपुत्रास दूर ठेवले आहे. पहिल्यांदाच निवडणूक आखाड्यात उतरलेले अभिजित दिघोळे यांनी ‘काँटे की टक्कर’ दिली; मात्र, एका मताने त्यांचा निसटता पराभव झाला. नातेसंबंध अधिक दृढ असल्याचा फायदा तानाजी जायभावे यांना झाला. कोंडाजी आव्हाड यांच्यासारख्या मातब्बरास रात्रीतून घरी पाठवत संस्थेच्या सभासदांनी त्यांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -