घरमहाराष्ट्रनाशिकट्रक वाहक-मालकांकडून कंटेनरचालकांना धमक्या

ट्रक वाहक-मालकांकडून कंटेनरचालकांना धमक्या

Subscribe

कंटेनरद्वारे कांदा निर्यातीस ट्रक संघटनेचा विरोध, व्यापाऱ्यांना मात्र मनस्ताप

कंटेनरद्वारे कांदा व्यापार्‍यांनी गोडावूनमधून निर्यातीसाठी वापर सुरु केल्याने जिल्ह्यातील ट्रक वाहक-मालक संघटनेने याला विरोध दर्शवत कंटेनर चालक-मालकांना दमबाजी करत जिल्ह्यात कांद्यासाठी कंटेनर न पाठवण्याचे फर्मान काढल्याने कांदा व्यापार्‍यांनी लासलगाव दौर्‍यावर आलेले पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देऊन लक्ष देण्याची विनंती केली.

जिल्ह्यातील लासलगावसह प्रमुख कांद्याच्या बाजार समित्यांमध्ये खरेदी केलेला कांदा हा सुरक्षित व योग्य प्रतवारीमध्ये कंटेनरच्या माध्यमातून मुंबई बंदरापर्यंत व तेथून पुढे तो विदेशात रवाना केला जातो, परंतु गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील ट्रक वाहक संघटनेने कंटेनर चालक मालकांना दमबाजी करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम कांदा व्यवसायावर होत असून परिणामी कांदा या शेतीमालाचा निकस व्यापार्‍यांकडून कमी होत चालला आहे व्यापार्‍यांच्या गोडाऊनवर मोठ्या प्रमाणात कांदा पडून असल्याने कांद्याची निर्यात कशी करावी, असा प्रश्न आता उभा राहिला आहे. यासाठी भुजबळांना लक्ष घालावे, असे लासलगाव नंदकुमार डागा यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -