भरस्त्यात कथित भाईंचा तीनजणांवर हल्ला

इथले भाई फक्त आपणच, असे म्हणत कथित भाईने पोलिसांच्या नाकावर टिच्चून सहा साथीदारांसमवेत तिघांवर हल्ला केल्याची केल्याची घटना दिव्या अ‍ॅडलॅब थिएटरसमोर, त्रिमुर्ती चौक येथे घडली. याप्रकरणी निनाद भिमाशंकर आहेर यांनी अंबड पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

crime
प्रातिनिधिक फोटो

पोलिसांच्या माहितीनुसार, निनाद व त्याचा मित्र प्रथमेश विजय दारुणकर, श्याम शिवाजी काळे दुचाकीवरुन जात होत. त्यावेळी स्वप्न्या नावाच्या युवकाने निनादला मारहाण केली. मारहाण का केली असे निनादने स्वप्न्याला विचारले असता राग अनावर झाल्याने सातजण निनादजवळ आले. तु जास्त शहाणा झाला का, साल्याला सोडू नको, इथले भाई फक्त आपणच, असे म्हणत स्वप्न्या व त्याच्या साथीदारांनी निनादसह त्याच्या मित्रांना मारहाण केली. पुढील तपास शिवाजी गारले करत आहेत.

वाढती गुन्हेगारी पोलिसांना डोकेदुखी

शहरात दररोज घरफोडी, सोनसाखळी चोरीसह परिसरात कथित भाई व खंडणीखोर पोलिसांच्या नाकावर टिच्चून दहशत निर्माण करत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे शहर पोलिसांचा गावगुंडांवरील वचक कमी झाल्याचे घटनांवरुन दिसून येत आहे. पोलिसांनी सामान्य नागरिकांवर वाहतुकीच्या नावाखाली कारवाई करण्यापेक्षा गावगुडांच्या आधी मुसक्या आवळाव्यात, असे नाशिककर म्हणू लागले आहेत.