घरमहाराष्ट्रनाशिकपंचवटीत पुन्हा तीन कोरोना पॉझिटिव्ह

पंचवटीत पुन्हा तीन कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

पंचवटी परिसरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आणखी तीन रुग्णांची वाढ झाली आहे. बाजार समिती हॉटेलचालक कोरोनाबाधित आढळले होते, त्या हॉटेलमधील दोन कारागीरांबरोबरच राहुलवाडीतील रुग्णाच्या संपर्कात आलेला एक अशा तिघांना कोरोनाची बाधा झाली आहे.

सध्या जगभरात कोरोना विषाणू ने थैमान घातले आहे. पंचवटी विभागात सुरुवातीस म्हसरूळ त्यानंतर हिरावाडी जत्रा हॉटेल, धात्रक फाटा या परिसरात रुग्ण आढळून आले होते. पंचवटीतील कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळभाज्या व्यापारी व पुढील चोवीस तासात हॉटेल व्यावसायिकदेखील कोरोनाबाधित आढळून आला. त्यात फळभाज्या व्यापारीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या व्यापाऱ्याच्या संपर्कात (हाय रिस्क) आलेल्या २८ जणांच्या कोरोना तपासणी करण्यात आली. दि.२५ रोजी प्राप्त तपासणी अहवालात फळभाज्या व्यापारी त्याच्या पत्नीसह एकूण १३ रुग्ण व (दि.२६) रोजी सरस्वती नगर येथील राहुल अपार्टमेंट मध्ये दोन बाधित आणि बुधवार (दि.२७) रोजी बाजार समितीतील हॉटेल व्यावसायिकाच्या संपर्कात आलेले दोन कारागीर व राहुल वाडीतील रुग्णाच्या संपर्कात आलेला एक रुग्ण वाढला आहे. एकून पंचवटी म्हसरुळ आणि  आडगाव  कोरोनाचे हॉटस्पॉट बघु पहात असुन परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे तरीदेखील नागरिकांनी घाबरुन न जाता पोलिस आणि जिल्हा प्रशासनाच्या सूचना, नियम आणि आदेशाचे काटेकोरपणे पालन केल्यास कोरोनाचे संक्रमण निश्चितच रोखू शकतो, असा इशाराच पंचवटी विभागीय अधिकारी विवेक धांडे यांनी व्यक्त केला आहे.
Saiprasad Patil
Saiprasad Patilhttps://www.mymahanagar.com/author/sppatil/
गेल्या १३ वर्षांपासून नाशिकमध्ये पत्रकारितेचा अनुभव. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, गुन्हेगारी यासह विविध विषयांवर लिखाण. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील घडामोडींवर लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -