पाझर तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींसह एका मुलीचा मृत्यू

Drowning
प्रातिनिधिक छायाचित्र

पेठ तालुक्यातील अंबापूर गावापासून एक किलोमीटर अंतरावरील खंबाळे पाझर तलावात बुडून तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांत दोन सख्ख्या बहिणींचा समावेश आहे. पूनम संतोष बोके (१३, रा. अंबापूर), योगिता पंढरीनाथ किलबिले (१२, रा. उभीधोंड), निशा पंढरीनाथ किलबिले (९, रा. उभीधोंड) अशी तिघींची नावे आहेत.

बुधवारी (दि.१३) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास अंबापूर येथील घरापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावरील खंबाळे येथील पाझर तलावावर तिघी मुली कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. दुपारी बारा वाजेपर्यंत घरी न आल्याने पाझर तलावावर आंघोळ करत असतील असे घरच्यांना वाटले. दरम्यान, दुपारी एक वाजेच्या सुमारास भगवान रानडे या व्यक्तीने नामदेव बोके यांना फोनद्वारे पाझर तलावात मुली पडल्याचे सांगितले. घरातील व्यक्तींनी तलावाकडे धाव घेतली. पाझर तलावातून तिनही मुलींना तातडीने बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेने शहरासह तालुक्यात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार संदीप भोसले, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी खंबाळे येथील पाझरतलाव येथे जाऊन पाहणी केली.