घरमहाराष्ट्रनाशिकविंचूर-प्रकाशा महामार्गावर पिकअप व ट्रकचा भीषण अपघात; तीन ठार

विंचूर-प्रकाशा महामार्गावर पिकअप व ट्रकचा भीषण अपघात; तीन ठार

Subscribe

पिकपमधील २५ ते ३० प्रवाशी गाडीतून बाहेर फेकले गेले, खड्डे टाळण्याच्या प्रयत्नात झाला अपघात

वीरगाव : शिर्डी-साक्री महामार्गावर वनोलीजवळील म्हसोबा मंदिराजवळ पिकअप व ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर, दोघांचा मालेगावी उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. गुरुवारी (दि. २४) रात्री नऊ वाजेच्या सुमारास झालेल्या या घटनेत २० जण गंभीर जखमी झाले.

विंचुर-प्रकाशा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असुन, या महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. खड्ड्यामुळे महामार्गावर दुचाकी व चारचाकी वाहणांचेअपघाताचे प्रमाणात वाढत असून,यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.गुरुवारी रात्री निफाड तालुक्यातील चांदोरी येथून उस तोडणीचे काम संपवून शिरवाडे (ता. साक्री) येथील मजुर पिकअप वाहन क्रमांक (एम.एच.१५, एफ.व्ही.४८३९) घरी परतत असताना वनोलीजवळील म्हसोबा मंदिराजवळ खड्डे टाळण्याच्या नादात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून पिकअप समोरून येणार्‍या मालट्रक (टीएन. ८८, वाय ८३९९) ला जोरदार धडकून उलटला. या धडकेत पिकअपमधील २५ ते ३० प्रवाशी गाडीतून बाहेर फेकले गेले. यात कानु रबा ठाकरे (वय ४२) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, दोघांचा मालेगावी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. २० जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

या अपघातातील जखमींना स्थानिकांनी तत्काळ उपचारासाठी सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी अत्यवस्थ तिघांना नाशिकला, तर नऊ जणांना मालेगाव येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. जखमींमध्ये चार महिला, चार पुरुष आणी चार लहान मुलांचा समावेश असुन, त्यांच्यावर सटाणा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अपघातामुळे रस्त्याच्या दुतर्फा काही काळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत मजुरांची ओळख पटवली. सटाणा पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन, सहायक पोलीस निरीक्षक किरण पाटील, बीट कर्मचारी रवींद्र भामरे, बस्ते अपघाताचा तपास करत आहेत.

असह्य वेदनांचा आक्रोश

गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास निफाड तालुक्यातील चांदोरी गावाहून ऊस तोडणीचे काम संपवुन मजुर आपल्या घरी पिकअप वाहनाने जात होते. मात्र, अचानक काही कळण्याच्या आत संपूर्ण परिसर प्रचंड अशा भीषण आवाजाने हादरुन गेला आणि २५-३० मजुरांचा असह्य वेदनांचा आवाज अस्वस्थ करणारा होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -