घरमहाराष्ट्रनाशिकचारधामला जाणार्‍या नाशिकच्या चौघांचा अपघाती मृत्यू

चारधामला जाणार्‍या नाशिकच्या चौघांचा अपघाती मृत्यू

Subscribe

नाशिकहून चारधाम यात्रेसाठी गेलेल्या नाशिकच्या चौघांचा मध्यप्रदेशातील खासगी ट्रॅव्हल्स बसच्या भीषण अपघातात मंगळवारी, १२ जूनला दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या १८ जणांना उपचारानंतर दुसर्‍या वाहनाने नाशिकला रवाना करण्यात आले आहे. मध्यप्रदेश सरकारतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांच्या नातेवाईकांना ४ लाख व जखमींना प्रत्येकी ५० हजार रूपयांची मदत खात्यावर जमा केली जाणार असल्याचे विदिशाचे जिल्हाधिकारी कौशलेंद्र विक्रमसिंह यांनी सांगितले.

मंगळवारी (दि. ११) रात्री १० च्या सुमारास नाशिकहून चारधामला जाणार्‍या बसचा अपघात झाला. नाशिकहून ५५ प्रवासी सर्वज्ञ यात्रा कंपनीच्या बसने चित्रकूटला जात होते. मध्यप्रदेशमधील विदिशा-सागर रोडवर हा अपघात झाला. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. अपघातात १८ जण जखमी व ९ जण किरकोळ जखमी झाले. जखमींवर तातडीने उपचार करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बसमध्ये अडकलेल्या काही प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आहे. विदिशा-सागर मार्गावर भरधाव वेगाने जात असताना स्टेअरिंग लॉक झाल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सूत्रांनी सांगितले. ही बस उज्जैनहून चित्रकूटला चालली होती. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख, तर जखमींना ५० हजारांची मदत जाहीर केली आहे.

- Advertisement -

मृतांची नावे अशी…

सुनंदाबाई ऊर्फ सविता भगवंत ढिकले (५५, रा.सिद्ध पिंपरी), मंदाबाई अशोक केदारे (६२, रा. नाशिक), दशरथ काशीराम यादव (६४, रा.शिंदे), शिवाजी बोराडे (४०, रा.पिंपळगांव खांब) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.

अपघातातील जखमींची नावे

अशोक लक्ष्मण केदारे (६२, रा.नाशिक), प्रदिप रामकृष्ण जोशी (४०, रा. कामठवाडा, नाशिक), सुमन बलवंत शिंदे (५८, रा.कल्याण), रामदास रघुनाथ जाधव (६१, रा.शिंदे), बाजीराव गणपत बेलदार (४९, रा.भगूर, नाशिक), वैशाली रमेश जाजू (४१, रा.सिन्नर), भीमाबाई रामदास यादव (५१, रा.शिंदे), ममता अशोक केदारे (६०, नाशिक), बाळू बनसोडे (४७, रा.नाशिक), हौसाबाई दशरथ यादव (६०, रा.शिंदे), पुष्पाबाई भगवान दास (४०, रा.नाशिक), नवनाथ विनायक कुकडे (२४, रा.पिंपळगांव), बाळू महादू बोरसे (रा.नाशिक) चंद्रकला प्रकाश (४५, रा.नाशिकरोड).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -