घरमहाराष्ट्रनाशिकपांजरापोळची जमीन संपादीत करण्याच्या आ. फरांदे यांच्या मागणीमुळे पुन्हा वाद पेटणार?

पांजरापोळची जमीन संपादीत करण्याच्या आ. फरांदे यांच्या मागणीमुळे पुन्हा वाद पेटणार?

Subscribe

नाशिक : शहराचा औद्योगिक विकास व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून चिंचोले येथील पांजरपोळ संस्थेची जागा संपादित करण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत केली. अर्थसंकल्पावर बोलताना आमदार देवयानी फरांदे यांनी ही मागणी केली.

नाशिक शहर झपाट्याने विकसित होत असून त्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र विकसित होत नसल्याबाबत खंत व्यक्त केली. नाशिक शहरातील वातावरण उद्योगासाठी पूरक असताना अनेक व्यावसायिकांकडून नाशिक येथे जागेची मागणी केली जाते. परंतु, जागा उपलब्ध नसल्यामुळे उद्योगांमध्ये वाढ करणे शक्य होत नसल्याचे आमदार देवयानी फरांदे यांनी स्पष्ट केले. यामुळे नाशिक शहरातील बेरोजगारीची समस्या गंभीर होत असल्याचे आमदार फरांदे यांनी सांगितले.

- Advertisement -

औद्योगिक वसाहतीला लागून चिंचाळे शिवारात पांजरपोळ संस्थेची 825 एकर जागा असून ही जागा भूसंपादित केल्यास नाशिक येथे येऊ इच्छिणार्‍या व्यावसायिकांना जमीन देणे शक्य होणार असल्याचे स्पष्ट करताना बाजारभावाप्रमाणे सदर जागा भूसंपादित केल्यास पांजरपोळ संस्थेकडून गाईंचे पालन करण्यासाठी ग्रामीण भागात जमीन विकत घेतली जाऊ शकते व शहरातील औद्योगिक क्षेत्राची समस्यादेखील संपुष्टात येऊ शकते असे मत व्यक्त करताना याबाबत तत्काळ कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

काय आहे पांजरपोळ 

नाशिक येथील पांजरपोळ येथे १२०० ते १३०० एकर जागा उपलब्ध आहे.ही जमीन श्री नाशिक पंचवटी ट्रस्टकडे आहे. राज्य सरकारकडून त्यांना ही जमीन काही अटी आणि शर्ती घालून देण्यात आली आहे. सद्यस्थितीत नाशिक शहराच्या वाढत्या शहरीकरणाला अनुसरून शहराच्या आगामी नियोजनासाठी ही जमीन शासनाकडे हस्तांतरित करण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून विविध नेत्यांनी केली आहे.

- Advertisement -
पर्यावरण प्रेमींचा विरोध 

दरम्यान, पांजरपोळच्या विस्तीर्ण जागेत मोठ्या प्रमाणात वृक्ष आहे तसेच जैव विविधताही आहे. एकाबाजूला शहरात प्रदूषणाची पातळी वाढत असताना तसेच वाढत्या शहरीकरणामुळे शहरातील वृक्ष संपदा गतीने कमी होत आहे. अश्या परिस्थितीमध्ये पांजरपोळ शहरसाठी प्राणवायू म्हणून आहे. त्याठिकाणी कोणत्याही प्रकारे मानवी हस्तक्षेप घातक ठरेल असे म्हणत पर्यावरण प्रेमी सतत त्याठिकाणी कुठल्याही विकसकामाच्या विरोधात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -