घरमहाराष्ट्रनाशिकहेल्मेट कारवाईतून वाहतूक शाखा मालामाल

हेल्मेट कारवाईतून वाहतूक शाखा मालामाल

Subscribe

सोमवार ते शुक्रवार शहर पोलिसांनी ९५ हजार वाहनांची तपासणी करत ५ हजार ७५० वाहनांवर कारवाई करत २० लाख २४ हजार ६०० रूपयांचा दंड वसूल केला.

शहरातील वाढते अपघात आटोक्यात आणण्यासाठी शहर पोलिसांतर्फे सोमवार (ता. १३) पासून हेल्मेट मोहीम राबविली जात आहे. सोमवार ते शुक्रवार शहर पोलिसांनी ९५ हजार वाहनांची तपासणी करत ५ हजार ७५० वाहनांवर कारवाई करत २० लाख २४ हजार ६०० रूपयांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई सलग २१ दिवस सुरु राहणार असल्याने विना हेल्मेट व सीटेबेल्टचालकांचे धाबे दणाणले आहेत. हेल्मेट ड्राईव्हाचा शहरात सकारात्मक परिणाम झाला असून ८५ टक्के वाहनचालक हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करीत असल्याचे शहर पोलिसांच्या निदर्शनास आले.

शहरात जानेवारी ते एप्रिल २०१९ या चार महिन्यात ५९ अपघातांमध्ये ६३ वाहनचालकांचा बेशिस्त, भरधाव वेगामुळे अपघाती मृत्यू झाला आहे. शहरातील अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी सोमवारपासून (ता. १३) शहर वाहतूक नियंत्रण शाखा व सर्व पोलीस ठाणे मिळून हेल्मेट न वापरणार्‍यांवर संयुक्त कारवाईची विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. हेल्मेट ड्राईव्ह मोहिमेअंतर्गत शहरातील १३० नाक्यांवर ५२० पोलीस व ५२ अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. विना हेल्मेट व सीटबेल्ट वाहनचालकांची धरपकड करून दंडात्मक कारवाई केली जात आहे. सोमवारी (ता.१३)पासून शहरातील १३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदीचे एकूण १३० नाके निश्चित करण्यात आले. पोलीस ठाणेनिहाय अ, ब, क वर्गवारीनुसार शहरात नाकाबंदी करण्यात आली. प्रत्येकी पोलीस ठाणेनिहाय दोन पॉइंटनुसार २० नाके ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार एका पोलीस ठाण्याला प्रत्येकी १३० कर्मचारी आणि ३० वाहतूक पोलीसांचा बंदोबस्त आहे. मोहिमेचे नियंत्रण प्रत्येक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच वाहतून शाखेच्या निरिक्षकांकडून पॉइंटनुसार केले जात आहे.

- Advertisement -

सोमवारी (ता.१३) शहरात ३० हजारांहून अधिक वाहनांची तपासणी करत १०९६ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यातून वाहतूक शाखेने ५ लाख ४८ हजार रूपयांचा दंड वसूल केला. या दिवशी ८० टक्के वाहनचालकांनी हेल्मेट व सीटबेल्टचा वापर केल्याचे निदर्शनास आले आहे. मंगळवारी (ता. १४) वाहतूक शाखेतर्फे २८ हजारांहून अधिक वाहनांची तपासणी करत १,३३७ वाहनांवर कारवाई केली. त्यामध्ये ५६७ विनाहेल्मेट, १२९ विनासीटबेल्ट वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या दिवशी ९० टक्के जणांनी हेल्मेट परिधान केल्याचे निदर्शनास आले. बुधवारी (ता. १५) ५१२ विना हेल्मेट, ७३ विनासीटबेल्ट वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या दिवशी ८५ टक्के जणांनी हेल्मेट परिधान केल्याचे निदर्शनास आले आहे. गुरुवारी (ता. १६) ४१८ विनाहेल्मेट व ७८ विनासीटबेल्ट वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या दिवशी ८० टक्के वाहनचालकांनी हेल्मेट व सीटबेल्ट परिधान केल्याचे निदर्शनास आले आहे. शुक्रवारी (ता.१७) २९० विनाहेल्मेट व ५८ विनासीटबेल्ट वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या दिवशी ८५ टक्के वाहनचालकांनी हेल्मेट व सीटबेल्ट परिधान केल्याचे निदर्शनास आले आहे.

शहरात सकारात्मक परिणाम

शहरात जानेवारी ते एप्रिल २०१९ पर्यंत ५९ फेटल अपघात झाले असून, यामध्ये ६३ वाहनाचालकांचा मृत्यू झाला आहे. भरधाव, बेशिस्त व विना हेल्मेटमुळे ३५ दुचाकीचालकांचा व ४ चारचाकी चालकांचा विनासीटबेल्टमुळे मृत्यू झाला आहे. हेल्मेट ड्राईव्ह मोहिमेमुळे शहरात सकारात्मक परिणाम झाला असून ८० ते ९० टक्के वाहनचालक हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. – विश्वास नांगरे-पाटील, पोलीस आयुक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -