घरमहाराष्ट्रनाशिकविसर्जन मिरवणुकीत वाहनांना प्रवेश बंदी

विसर्जन मिरवणुकीत वाहनांना प्रवेश बंदी

Subscribe

ट्रॅफिक होऊ नये म्हणून शहर पोलिसांतर्फे अधिसूचना जारी

गणेशोत्सव २ ते १२ सप्टेंबर या कालावधीत असल्याने पाचव्या दिवशी (ता.६), सातव्या (ता.८) व गुरुवारी (ता.१२) गणेशमूर्ती विसर्जन होणार असून या दिवशी शहरात विसर्जन मिरवणूक काढण्यात येते. त्यावेळी आरास व मिरवणूक पाहण्यासाठी पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, रविवार कारंजा, अशोकस्तंभ या ठिकाणी गणेशभक्त मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी शहर वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी अधिसूचना जारी केली आहे.

विसर्जन मिरवणुकीदरम्यान गर्दीतून रुग्णवाहिका, पोलीस वाहने व अग्निशमन दलाच्या वाहनांना जाता यावे, वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी शहर वाहतूक विभागाने नियोजन केले आहे. मिरवणूक मार्गावर एसटी बस, खासगी वाहनांना बंदी करण्यात आली आहे. हे निर्बध पोलीस वाहने, रुग्णवाहिका व अग्निशमनदलाच्या वाहनांना लागू राहणार नाहीत, असेही वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

तीन दिवस प्रवेश बंदी

निमाणी बसस्थानकावरुन पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, रविवार कारंजा मार्गावर जाणार्‍या सर्व बसेस, अवघड वाहने शुक्रवारी (ता.६), रविवारी (ता.८) व गुरुवारी (ता.१२) दुपारी २ ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीस बंद राहणार आहेत. पर्यायी मार्ग – पंचवटी कारंजा, काट्या मारुती चौक, संतोष टी पॉईंट, कन्नमवारपुल, व्दारका सर्कल या मार्गाने नाशिक, नाशिकरोड, अंबड, सातपूरकडे जातील.

सीबीएसवरुन पंचवटीकडे असे जा

सीबीसकडून पंचवटीकडे जाणार्‍या बसेस, इतर सर्व वाहनांना अशोकस्तंभ ते रविवार कारंजा मार्गे पंचवटी कारंजा पर्यंत वाहतुकीस प्रवेश बंदी करण्यात आली आहे. पर्यायी मार्ग – अशोकस्तंभ, रामवाडी ब्रीज, मखमलाबाद नाका, पेठ नाका सिग्नल, दिंडोरीनाका या मार्गावरुन वाहनचालकांनी निमाणी स्टॅण्ड मार्गे पंचवटीकडे जावे.

- Advertisement -

दररोज रात्री १२ वाजेपर्यंत बंद असणारे मार्ग

वाहतूक नियंत्रणासाठी ६ ते ११ सप्टेंबर या कालावधीत सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत शहरात विविध मार्ग बंद राहणार आहेत. मोडक सिग्नल व खडकाळी सिग्नलकडून कालीदास कलामंदिरमार्गे सुमंगल कपड्याचे दुकान, शालिमार चौकाकडे जाणारा रस्ता दोन्ही बाजून सर्व वाहनांसाठी बंद राहणार आहे. पर्यायी मार्ग – मोडक सिग्नल व खडकाळी सिग्नल येथून किटकॅट चौफुलीकडे येणारी व कालिदास कलामंदिरमार्गे सुमंगल कपड्याचे दुकानाकडे ये-जा करणारी वाहने सारडा सर्कल, गडकरी सिग्नल, मोडक सिग्नलकडून सीबीएस सिग्नल, सीबीएसकडून गायकवाड क्लास, कान्हेरेवाडी मार्गे किटकॅट, सुमंगल कपड्याच्या दुकानाकडे व ‘सुमंगल’कडून कालिदास मार्ग व किटकॅटकडून सीबीएस बाजूकडे ये-जा करणारी वाहतुकीस दोन्ही बाजून प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

पंचवटी विभागातील सरदार चौक ते काळाराम मंदिरापर्यंत रस्ता दोन्ही बाजून सर्व वाहनांसाठी प्रवेश बंद राहणार आहे. तर मालविय चौक ते गजानन चौक, गजानन चौक ते नाग चौक, नाग चौक ते शिवाजी चौक, शिवाजी चौक ते मालविय चौक दरम्यान दोन्ही बाजू प्रवेश बंद राहणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -