घरमहाराष्ट्रनाशिकवाहनाच्या धडकेत वाहतूक पोलीस कुमार गायकवाड यांचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत वाहतूक पोलीस कुमार गायकवाड यांचा मृत्यू

Subscribe

पेठ पोलिस स्टेशनपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील दुर्दैवी घटना

पेठ पोलिस स्टेशनपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर कर्तव्य बजावत असलेले वाहतूक पोलिस कुमार गायकवाड यांचा कंटेनरच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि.३०) दुपारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी ट्रेलरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. रस्ता सुरक्षा सप्ताहातच ही दुर्दैवी घटना घडल्याने रस्ता सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नाशिक-पेठरोडवरील सावळे घाटात हॉटेल साईकिरणनजीक नाकाबंदी करण्यात आलेली होती. यावेळी कर्तव्यावर असलेल्या गायकवाड यांना सिमेंट मिक्सर वाहनाने त्यांना धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. गुजरातकडून येणार्‍या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली होती. आडगाव येथे राहणार्‍या कुमार गायकवाड यांची उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणुन वेगळी ओळख होती. दरम्यान, अपघातप्रकरणी पोलिसांनी ट्रेलरचालक राजीव गर्जे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. गायकवाड यांच्या मृत्यूने ग्रामीण पोलीस दलात हळहळ व्यक्त होते आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -