घरताज्या घडामोडीवाहतूक पोलीस ‘टार्गेट फ्री’ ‘आरटीओ’कडून दंडवसुली

वाहतूक पोलीस ‘टार्गेट फ्री’ ‘आरटीओ’कडून दंडवसुली

Subscribe

नाशिकlवाहनचालकांकडून दंड वसुलीचे टार्गेट आता पोलिसांना दिले जाणार नाही, अशी माहिती पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी दिली. दरम्यान, परिवहन विभागाकडून कागदपत्रांची तपासणी करत बेशिस्त वाहनचालकांकडून दंड वसुली केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी शहर वाहतूक पोलीस चौकाचौकांत उभे राहून वाहतुकीला शिस्त लावत आहेत. प्रसंगी वाहनचालकांकडून दंड वसूल करत आहेत. आरटीओ वाहनचालकांचे लायस्न, पीयुसी, आरसी बुक, वाहनांमध्ये बदल केले आहे की नाही, याची तपासणी करणार आहेत. आरटीओमार्फत वाहनचालकावर कारवाई करताना पोलीसही मदत करणार आहेत. घटनास्थळी सुरुवातील पोलीस असतात. त्यामुळे पोलिसही बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करतील. आरटीओ आणि पोलीस संयुक्तिक कारवाई करतील. वाहतूककोंडी फोडून ते सुरुळीत करणे आमचे काम आहे. आवश्यक वाटल्यास पोलीस हस्तक्षेप करतील, असेही त्यांनी सांंगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -