घरताज्या घडामोडीआरोग्य विद्यापीठातर्फे डॉक्टर, परिचर्यांना प्रशिक्षण

आरोग्य विद्यापीठातर्फे डॉक्टर, परिचर्यांना प्रशिक्षण

Subscribe

शुक्रवारी शासनाला अहवाल पाठवणार; एनएसएसच्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र नोंद

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी व परिचर्यांना महाविद्यालयातर्फे ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे. आवश्यकता भासल्यास त्यांना करोनाच्या उपाययोजनांमध्ये सहभागी करुन घेण्याचा मनोदय विद्यापीठाने ठेवला आहे. त्यामुळे प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी सर्व महाविद्यालयांनी या प्रशिक्षणाचा अहवाल शासनाकडे सुपुर्द करण्याचे आदेश विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.कालिदास चव्हाण यांनी दिले आहे.
केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे करोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. समाजातील विविध वर्गासाठी प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध करुन देण्यात आला आहे. महाविद्यालयांना आयगॉट.जीओव्ही.इन या लिंकवर उपलब्ध आहे. विद्यापीठाशी संलग्न विविध आरोग्य विज्ञान विषयक अभ्यासक्रमाच्या संस्थामार्फत सर्व घटकांना करोना (कोविड 19) या साथ रोगाबाबत आवश्यक प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा देणारे किंवा मुख्य सेवा देण्यासाठी प्रशिक्षित डॉक्टर, परिचर्या व पॅरावैद्यक कर्मचारी त्वरीत उपलब्ध होऊ शकतील. त्यामुळे आरोग्य विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर, पॅरामेडीकल कर्मचारी, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांना प्रशिक्षण देण्यासाठी महाविद्यालय स्तरावर तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश कुलसचिवांनी दिले आहेत. प्रशिक्षण पुर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींच्या संख्येचा अहवाल  डॉ.प्रदीप आवळे यांच्या इ-मेल आयडीवर शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत पाठवण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) विद्यार्थ्यांचा स्वतंत्र अहवाल सादर करण्याचे या आदेशात म्हटले आहे.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -