Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र फाईल्सच्या प्रवासाचा कालावधी कमी होण्यासाठी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण; नाशिक 'झेडपी'ची शक्कल

फाईल्सच्या प्रवासाचा कालावधी कमी होण्यासाठी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण; नाशिक ‘झेडपी’ची शक्कल

Subscribe

नाशिक : जिल्हा परिषदेत कनिष्ठ सहाय्यक अधिकारी ते मुख्य कार्यकारी अधिकारी असा फाईलींचा होणारा प्रवास सुलभ व्हावा, तसेच फाईलींच्या प्रवासाला कमी वेळ लागावा यासाठी फाईलींवर होणारे टिपणी लेखन योग्य पध्दतीने करण्यात यावे तसेच टिपणी लेखनाचे तंत्र कनिष्ठ सहाय्यक अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक अधिकारी, सहाय्यक प्रशसन अधिकारी यांना आत्मसात व्हावे यासाठी त्या त्या क्षेत्रातील विषयतज्ञांना बोलावून संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील कनिष्ठ सहाय्यक अधिकारी, सहाय्यक प्रशासन अधिकारी यांना दोन दिवसीय प्रशिक्षण देण्यात येत आहे.

या प्रशिक्षणाचा प्रारंभ शुक्रवारी (दि.17) जिल्हा परिषदेच्या रावसाहेब तोरात सभागृहात करण्यात आला. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी हजर होते. पहिल्या सत्रात, कनिष्ठ लेखाधिकारी प्रियंका कुलकर्णी हयांनी पेन्शन प्रकरणे या विषयांवर मार्गदर्शन केले. यात प्रामुख्याने सेवानिवृत्त कर्मचा-यांस वेळेत पेन्शन मिळावे सेवापुस्तिका कशाप्रकारे भरावेत, जेणेकरुन सेवानिवृत्तीच्या दिवशी संबंधित कर्मचा-यांस फायदे पोहोचविणे सोपे होईल याचबरोबर पेन्शन प्रकरणाच्या फाईली कशा पध्दतीने निकाली काढाव्यात, येणारे अडथळे, त्यांचे निवारण कसे करावे यावर कुलकर्णी मार्गदर्शन केले.

- Advertisement -

प्रशिक्षणाच्या दुस-या सत्रात, कनिष्ठ प्रशासन अधिकारी भुषण प्रकाश भार्गवे यांनी पंचायत राज सेवार्थ, अनुषंगीक कार्यवाही करणे, लेव्हल १ लेव्हल २ लेव्हल 3 याबाबत सविस्तर विवेचन केले. अखेरच्या टप्यात माध्यमिकचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी शिवराम बोटे यांनी सर्व रजेचे प्रकार व रजा नियम, बालसंगोपन रजा सेवाप्रवेश नियमाच्या अनुषंगीक सर्व कामकाज पध्दती याबाबत उपस्थितीतांना मार्गदर्शन केले.

यात प्रामुख्याने बालसंगोपन रजा मंजुर करण्याबाबत कार्यवाही संदर्भात प्रत्येक तालुक्यातील पध्दत विचारली असता, सर्व तालुक्यांमधील कार्यवाहीत भिन्नता आढळणू येत असल्याचे यावेळी दिसून आले. उपमुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी या सत्रात सहभाग घेत बालसंगोपन रजा यावर मार्गदर्शन केले. यावेळी शासन आदेशाचे वाचन करत त्यातील पध्दती समाजावून सांगत त्यांचाच अवलंब करण्याचे निर्देश परदेशी यांनी यावेळी दिले. आज प्रशिक्षणाचा शेवटचा टप्पा असून यात उममुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी 4 विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -