नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी (रोहयो) नितीनकुमार मुंडावरे यांची धुळे येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर तुर्तास कोणत्याही अधिकार्याची नियुक्ती झालेली नाही. शासनाने मंगळवारी (दि.२९) राज्यातील १६ उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्यांची बदली केली आहे. या बदली आदेशात नाशिकचे मुंडावरे यांचा समावेश आहे.
मुंडावरे यांची धुळे येथे उपजिल्हाधिकारी (रोहयो) या पदावर नियुक्ती केली आहे. आपल्य कार्यकाळात मुंडावरे यांनी आपल्या विभागाच्या जबाबदारी बरोबरच विविध अभियानांमध्ये महत्वपूर्ण जबाबदारी सांभाळली. कोविड काळात नाशिकमध्ये अडकलेल्या विस्थापित मजूरांना त्यांच्या मुळ गावी परत पाठविण्यासाठी रेल्वे विभागाशी संपर्क साधून त्यांची सुरक्षित रवानगी करण्यात आली.
नाशिक येथे आयोजीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात प्रशासनाच्यावतीने नोडल अधिकारी म्हणूनही त्यांनी मुख्य भूमिका बजावली. नुकत्याच नाशिकमध्ये झालेल्या शासन आपल्या दारी उपक्रमाच्या आयोजनातही त्यांचा महत्वपूर्ण सहभाग राहीला. जिल्हा प्रशासनाच्यावतीने ज्या ज्या काही प्रमुख जबाबदार्या त्यांच्यावर सोपविण्यात आल्या त्या त्यांनी अतिशय चोख आणि नियोजनबध्द पध्दतीने राबविल्या.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. यापुर्वी मुंडावरे यांनी पर्यटन विभागाचे नाशिक विभागाचे उपसंचालक म्हणून मुंडावरे यांच्यासह वर्धा येथील उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) सोपान कासार यांची शासनाने जळगाव येथे निवासी उपजिल्हाधिकारी पदावर नेमणूक केली आहे. कासार यांनी यापूर्वी येवला येथे प्रांताधिकारी म्हणून काम पाहिले होते. बदली झालेल्या अधिकार्यांना तातडीने त्यांच्या नेमणूकीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.