घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रआधारआश्रम बलात्कार प्रकरणास आदिवासी विकास विभाग जबाबदार

आधारआश्रम बलात्कार प्रकरणास आदिवासी विकास विभाग जबाबदार

Subscribe

आदिवासी उलगुलान सेनेचा आरोप

पंचवटी : म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील ज्ञानपीठ गुरुकुल आधार आश्रम नावाच्या खासगी वसतिगृहातील पाच मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याच्या धक्कादायक घटनेस आदिवासी विकास विभागच जबाबदार आहे, असा आरोप आदिवासी उलगुलान सेनेने केला आहे.

पंचवटीतील रासबिहारी लिंक रोडवरील मानेनगर येथे द किंग फाऊंडेशन संचलित ज्ञानपीठ गुरूकुल आधार आश्रम नावाने खासगी वसतिगृह आहे. यात एका १४ वर्षीय मुलीने तिच्यावर अत्याचार होत असल्याची आपबिती चुलत बहिणीला सांगितली. पीडितेच्या बहिणीनी हा प्रकार आदिवासी उलगुलान सेनेचे संस्थापक तथा अध्यक्ष प्रभाकर फसाळे यांना सांगितला. त्यानंतर गुरुवारी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी संशयित आरोपीस हर्षल मोरे यास अटक केली आहे. पोलीस चौकशीत त्याने आणखी पाच मुलींचे लैगिक शोषण केल्यासचे समोर आले आहे.

- Advertisement -

प्रभाकर फसाळे म्हणाले की, ज्ञानपीठ आश्माअत घडलेल्या अत्याचार प्रकरणाला आदिवासी विकास विभाग जबाबदार आहे. आदिवासी विकास विभागाने नाशिक जिल्ह्यातील आश्रम शाळेचा दर्जा उंचावलेला नाही. शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध असतानाही दुर्गम भागात सुसज्ज वसतिगृह झालेले नाही. अद्यापपावेतो आदिवासी विकास विभाग यंत्रणा संपूर्णपणे सक्रिय नसल्याने विकृत मानसिकता असलेले खासगी वसतिगृह, आश्रमशाळा संचालक हे दुर्गम भागात पोहचून आदिवासी बांधवांना प्रलोभन देत आहे. त्यास आदिवासीबांधव बळी पडून त्यांची बालके अशा नराधमाची शिकार होत आहेत. आदिवासी विकास विभागातील यंत्रणेने सक्षमपणे व प्रामाणिकपणे काम केल्यास असे अमानवी प्रकार थांबून आदिवासी बांधवांना खर्‍या अर्थाने न्याय मिळू शकेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -