घरमहाराष्ट्रनाशिकमनोरुग्णाला वाचवण्याच्या प्रयत्नात उलटला ट्रक

मनोरुग्णाला वाचवण्याच्या प्रयत्नात उलटला ट्रक

Subscribe

नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल सेवन हेवन समोर झाला अपघात

नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल सेवन हेवन समोर अचानक आलेल्या मनोरुग्णाला वाचविण्याच्या प्रयत्नात लोखंडी पत्रे घेऊन जाणारा ट्रक उलटून अपघात झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.

मुंबईकडून नाशिकच्या दिशेने येत असलेल्या ट्रकसमोर अचानक मनोरुग्ण व्यक्ती आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. त्यात ट्रकचे दोन भाग होऊन, मागील भाग रस्त्यावर उलटला. १५ दिवसापूर्वीच सामाजिक कार्यकर्ते उत्तम काळे यांनी अनेक महिन्यांपासून महामार्गावर मुक्काम ठोकलेल्या मनोरुग्णाबाबत अंबड पोलिसांसह कंट्रोल रूमला माहिती दिली होती. तसेच, संभाव्य धोक्याची कल्पनाही दिली होती. मात्र, पोलिसांनी काहीही कार्यवाही न केल्याने आजचा अपघात झाल्याचे निदर्शनास आले आहे. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी अपघातावेळी समोरून अन्य वाहने असते तर मात्र अपघाताची भीषणता वाढली असती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -