घरमहाराष्ट्रनाशिकशिंदे गावाजवळ ट्रक जळून खाक

शिंदे गावाजवळ ट्रक जळून खाक

Subscribe

नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे गावाजवळील भांगरे मळा परिसरातील टोल नाक्याजवळ आयशर ट्रक जळून खाक झाल्याची घटना घडली. आगीचे कारण मात्र रात्री उशिरापर्यंत समजू शकलेले नव्हते.

शिंदे गावाजवळील भांगरे मळा येथे आयशर कंपनीचा ट्रक (एमएच-१५, इजी-९४७३) मालक विजय नारझिरे यांनी घरासमोर उभा केलेला होता. मध्यरात्रीच्या सुमारास नारझिरे झोपेत असताना सव्वा वाजेच्या सुमारास त्यांच्या शेजारील परशुराम तापारे यांनी ट्रक जळत असल्याचे सांगितले. त्यानंतर ट्रकमालक कुटुंबासह घराबाहेर आले व आग विझवण्याचा प्रयत्न केला. पोलीस पाटील रवींद्र जाधव यांना कळविण्यात आल्यानंतर त्यांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दल व पोलीस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन जवानांनी पाण्याचा मारा करून आग विझवली. ही आग नेमकी कशाने लागली याचे कारण समजू शकलेले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -