घरमहाराष्ट्रनाशिकचॅनेल निवडीला मुदतवाढ मिळूनही शहरात काही ठिकाणी ब्लॅक आउट

चॅनेल निवडीला मुदतवाढ मिळूनही शहरात काही ठिकाणी ब्लॅक आउट

Subscribe

केवळ ११ टक्के केबल ग्राहकांचाच प्रतिसाद, चॅनेल निवड न केल्यास ७ फेब्रुवारीपासून ब्लॅक आउट

’ट्राय’च्या नव्या नियमांनुसार तुम्ही वाहिन्यांची निवड केली नसेल तरीही पसंतीचे चॅनल निवडीसाठी ६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ जाहीर होऊनही, नाशिकमध्ये बहुतांश ठिकाणी केबल ग्राहकांकडे शुक्रवारी, १ जानेवारीलाच ब्लॅक आऊट झाल्याचे दिसून आले. दरम्यान, चॅनल निवडीबाबत अद्यापही ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था कायम असून अद्यापपर्यंत अवघ्या ११ टक्के केबल ग्राहकांनीच ट्रायच्या प्रणालीनूसार केबल ऑपरेटरकडे आपले अर्ज भरून दिले आहेत. जिल्ह्यात साधारणपणे सहा ते सात लाख, तर शहरात तीन लाख केबल ग्राहक आहेत.

आपल्या आवडीनुसार वाहिन्या निवडा आणि तेवढेच पैसे भरा’ या ’ट्राय’च्या निर्णयानंतर आजमितीस समोर येत असलेल्या पॅकेजांमुळे केबलग्राहकांमध्ये मोठा गोंधळ उडाला असून, त्यांना केबल सेवा सध्यापेक्षा महाग वाटू लागली आहे. म्हणूनच अनेक ग्राहकांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण करण्यात स्वारस्य दाखवलेले नाही. काही भागात केबलचालकही ग्राहकांपर्यंत पोहोचलेले नाहीत. ट्रायने या नियमावलीला मुदतवाढ देण्यास नकार दर्शवला असून याबाबतचे सर्वाधिकार एमएसआेंकडे दिले आहेत. त्यामुळे आजपासून टि.व्ही. बंद होणार की काय, असा प्रश्न केबल ग्राहकांना पडला होता. मात्र, अद्याप केबलचालक ग्राहकांपर्यंंत पोहोचले नसल्याने तसेच ग्राहकांमध्येही याबाबत अद्याप संभ्रम असल्याने एमएसआेंनी ग्राहकांना पॅकेज निवडीबाबत ६ फेब्रुवारीपर्यंत आवडत्या वाहिन्यांचा अर्ज भरून देण्यासाठी मुदत दिली आहे. अर्ज भरून न दिल्यास ७ फेब्रुवारीपासून ब्लॅक आउट करण्यात येणार आहे. त्यामुळे अशा ग्राहकांना ७ तारखेपासून टी.व्ही.बघता येणार नाही.

- Advertisement -

ग्राहकांनी पुढाकार घ्यावा

केबलचालकांनी ग्राहकांपर्यंत पोहोचणे सुरू केले आहे. मात्र, काही ग्राहकांनी अद्याप अर्ज भरून दिलेले नसून, काही भागांत केबलचालकही मनुष्यबळाअभावी ग्राहकांपर्यंत पोहचू शकलेले नाहीत. यामुळे ग्राहकांनीच पुढाकार घेऊन केबलचालकांशी संपर्क साधावा, असे आवाहन केबल ऑपरेटर संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -