घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रऊसाच्या शेतात आढळले ८ दिवसांचे दोन बिबट्याचे बछडे

ऊसाच्या शेतात आढळले ८ दिवसांचे दोन बिबट्याचे बछडे

Subscribe

मौजे वडनेर दुमाला शिवारात बुधवारी (दि.२६) शेतकरी संपत रामभाऊ पोरजे यांच्या ऊसाच्या शेतात ऊसतोड सुरु असतान दोन बिबट्याचे बछडे आढळून आले. हे बछडे अवघे ८ दिवसांचे आहेत.

संपत पोरजे यांच्या शेतात ऊसतोड सुरु आहे. नेहमीप्रमाणे कामगार बुधवारी सकाळी ऊसतोड करत होते. त्यावेळी कामगामारांना दोन बिबट्याचे बछडे दिसून आले. कामगारांनी तत्काळ शेतमालक पोरजेंशी संपर्क साधला. त्यानंतर पोरजे यांनी पोलीस पाटलांमार्फत वनविभागाशी संपर्क साधत बछडे आढळून आल्याचे सांगितली. त्यानुसार वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांनी बछड्यांची पाहणी केली असता ते ८ दिवसांचे असल्याचे निदर्शनास आले. तसेच, त्यांची प्रकृती चांगली आहे. बिबट्यांची मादी ऊसाच्या शेतापासून जवळच असल्याने अधिकार्‍यांनी मादी व पिल्लांची भेट घडवून आणण्याचे ठरविले. त्यासाठी ज्या ठिकाणी बछडे आढळून आले त्याच ठिकाणी मादी व पिल्लांचे भेट घडवण्याचा वनविभागाकडून प्रयत्न सुरु आहे. विशेष म्हणजे, बछड्यांच्या निगराणीसाठी ३६० डिग्रीमध्ये फिरणारा सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -