५० हजारांची लाच घेताना लिपीकासह एकाला अटक

shiv sena Corporator filed a complaint against Bribe

आजोबांचे नाव जमिनीवर लावण्यासाठी तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना नांदगाव तहसील कार्यालयातील लिपीक व एका खासगी व्यक्तीस गुरुवारी (दि.५) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. लिपीक समाधान निंबा पवार व नितीन अण्णा सोनवणे (रा.होलारवाडा, ता. नांदगाव, जि. नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या खासगी व्यक्तीचे नाव आहे.

नांदगाव शहरातील शहरातील सर्वे नंबर ७६५ (नवीन गट ५) क्षेत्र हे ८१ आर या क्षेत्रावर मृत्यू पत्राव्दारे तक्रारदारांचे आजोबांचे नाव लावण्यासाठी समाधान पवार व नितीन सोनवणे यांनी ५० हजार रुपये लाचेची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने शहानिशा करुन सापळा रचला. गुरुवारी (दि.५) खासगी व्यक्ती नितीन सोनवणेमार्फत तक्रारदाराकडून ५० हजार रुपये स्वीकारताना पथकाने अटक केली.