घरमहाराष्ट्रनाशिकआमदार अहिरे यांच्या कारच्या धडकेत दोघे सख्खे भाऊ ठार

आमदार अहिरे यांच्या कारच्या धडकेत दोघे सख्खे भाऊ ठार

Subscribe

साक्री पिंपळनेर मार्गावर धाडणे फाटयावर काँग्रेसचे आमदार डी. एस. अहिरे यांच्या कारने दुचाकीला धडक दिल्याने दोघे सख्खे भाऊ ठार झाले.

साक्री पिंपळनेर मार्गावर धाडणे फाटयावर काँग्रेसचे आमदार डी. एस. अहिरे यांच्या कारने दुचाकीला धडक दिल्याने दोघे सख्खे भाऊ ठार झाले. या अपघातात आमदार अहिरे यांच्यासह चालक किरकोळ जखमी झाला आहे. याबाबत साक्री पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

साक्रीचे आमदार डी. एस. अहिरे (एमएच- १८, एपी- ५६५) इनोव्हा कारने साक्रीकडून पिंपळनेर शहराकडे जात होते. यावेळी समोरुन भरधाव वेगाने येणारी दुचाकी कारसमोर आली. यामुळे कार चालकाला गाडीवर नियंत्रण ठेवणे अवघड झाली. परिणामी दोन्ही वाहनांमधे धडक झाली. अपघातानंतर या दोन्ही गाडया रस्त्याच्या कडेला एका खडडयात पडल्या. अपघातात मलांजन येथे रहाणारे सोनू दयाराम सोनवणे (वय ५३) व शांताराम दयाराम सोनवणे (वय ५०) हे दोघे भाऊ जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच धाडणे फाटा परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी आमदार अहिरे व त्यांच्या कारचालकास देखिल उपचारासाठी रुग्णालयात केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आले. यावेळी काही तरुणांनी मयतांच्या परिवारास नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी संतप्त भावना व्यक्त करण्यास सुरुवात केली. परंतु, पोलिसांनी समजूत काढल्याने या तरुणांनी शांतता ठेवली.

- Advertisement -

मनोमिलाफ होताच नियतीने घाला घातला

सोनवणे बंधु यांच्यात काही वर्षांपासुन वाद सुरु असल्याने त्यांच्यात बोलणे बंद होते. पण काही दिवसांपूर्वीच त्यांच्यात मनोमिलाफ झाला होता. त्यामुळे एकाच दुचाकीवरुन ते विवाहासाठी गेले होते. पण तेथुन परत येताना या दोघांचा मृत्यू झाला. यामुळे मलांजन परिसरातून हळहळ व्यक्त होते आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -