दोन बालकांवर दुगारवाडीत बिबट्याचा हल्ला

नाशिक ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू, हल्ल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमूस्ते येथील दुगारवाडी येथे दोन लहान मुलांवर बिबट्याने हल्ला केला. हल्ल्यात विशाल सुरुम (वय ८) गंभीर जखमी झाला असून, त्यास ग्रामीण रुग्णालय नाशिक येथे उपचारासाठी दाखल केले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवार (दि. २०) रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास हे दोघे मुले लघूशंकेसाठी घरातून बाहेर आल्यावर विशाल सुरुम (वय ८) व भिकाजी गोविंद सोहळे (वय १२) यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. हल्ल्यातून दोघांनीही वाचण्यासाठी दोघांनी प्रयत्न केले. मात्र, भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या बालकावर बिबट्याने हल्ला चढवून त्याला जखमी केले. अंतरा अंतराने इगतपुरी तालुक्यातील बिबट्याचे होणारे हल्ले कमी होत असताना आता त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून ग्रामीण भागातील जनता भीतीच्या सावटाखाली आपला जीव घेऊन जगत असल्याचे नागरिकांनी सांगितले. वनविभागाने पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी होत आहे.