घरमहाराष्ट्रनाशिकपंचवटीत अपघातांचे सत्र सुरूच; दोन अपघातांत दोन दुचाकीस्वार ठार

पंचवटीत अपघातांचे सत्र सुरूच; दोन अपघातांत दोन दुचाकीस्वार ठार

Subscribe

मृत्यूचा महामार्ग ठरलेल्या मुंबई-आग्रा हायवेवरील अपघाती बळीच्या घटना कायम असून, अशाच दोन घटनांत दोन मोटरसायकलस्वार ठार झाले. या दोन्हीही घटनांत मोठ्या वाहनांनी दुचाकींना पाठीमागून धडक दिली.

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव परिसरातील धात्रक फाटा परिसरातील दोन वेगवेगळ्या घटनांत दोन दुचाकीस्वार ठार झाले. पहिल्या अपघातात ट्रकच्या धडकेत दुचाकीचालक ठार झाला. तर, दुसर्‍या अपघातात मॅक्झिमो कारच्या धडकेत दुचाकीवर पाठीमागे बसलेला तरुण ठार झाला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर अपघातांचे सत्र सुरू आहे.

सोमवारी, २८ जानेवारीला सायंकाळी ७.३० वाजता बळी मंदिराकडून धात्रक फाट्याकडे जाणार्‍या सर्व्हिस रोडवरुन जाणाऱ्या भरधाव ट्रकवरील (एमएच ०४, डीडी ५१४१) चालकाने दुचाकीला (एमएच १८, एएच २९३५) कट मारला. त्यात साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील दुचाकीचालक प्रतीक उमाकांत शेवाळे (२१) याचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या घटनेत धात्रक फाट्याजवळील लोकमान्य रुग्णालय टी-पॉईंटजवळील रस्त्यावर भरधाव मॅक्झिमो ट्रकने (एमएच १५, सीके ९२२३) दुचाकीला (एमएच १५, ईवाय ९४६९) धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला जळगावच्या रावेर येथील मंदार रत्नाकर जोशी (१९) हा ठार झाला, तर दिंडोरी तालुक्यातील वरखेडा येथील दुचाकीचालक ऋषिकेश अनिल भुसाळ गंभीर जखमी झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -