घरताज्या घडामोडीनिफाडमध्ये एकाच पिंजर्‍यात दोन बिबटे जेरबंद

निफाडमध्ये एकाच पिंजर्‍यात दोन बिबटे जेरबंद

Subscribe

निफाड तालुक्यात वडाळीजवळ वनविभागाने लावलेल्या एकाच पिंजर्‍यात दोन बिबटे जेरबंद झाल्याची घटना रविवारी (दि.११) रात्री घडली. हे बिबटे अंदाजे दीड ते पावणे दोन वर्षाचे आहेत. दोन्ही बिबटे मादी जातीचे असून, या दोन्ही बिबट्याची पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या कडून तपासणी करण्यात आली आहे.

नाशकातील कादवा नदी काठवार असलेल्या निफाड़ तालुक्यातील वडाळी गावात ऊसाचे क्षेत्र आहे. या ठिकाणी बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक बिबटे मोकाट जनावरांसह नागरिकांवर हल्ले करत असल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर निफाड तालुक्यातील शेतकरी रोहन होळकर यांनी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. या मागणीला वन विभागाने सकारात्मक प्रतिसाद देऊन होळकर यांच्या ऊसाच्या शेतात पिंजरा लावला. या पिंजर्‍यात एकाच वेळी दोन बिबटे जेरबंद झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -