घरताज्या घडामोडीनैताळेत कौटुंबिक वादातून गोळीबार; एकास अटक

नैताळेत कौटुंबिक वादातून गोळीबार; एकास अटक

Subscribe

नैताळे येथील सविंद्र सुरेश पिंपळे कुटुबांसमवेत आज  सायंकाळी टी. व्ही. पाहत असताना दोनजणांनी अचानक घराचा दरवाजा तोडत हातातील पिस्तूलानी पिंपळे यांच्या दिशेने गोळीबार केला. सुदैवाने त्यात ते बचावले. या बाबत सावत्र मुलगी वैशाली रामा काळे यांच्या फिर्यादी वरून निफाड पोलिसानी दोन आरोपीपैकी एकास अटक केली.  एकजण फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

वैशाली रामा काळे महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या मुलीचे सावत्र वडील सविंद्र सुरेश पिंपळे व त्यांचे सावत्र भाऊ कमलेश सुरेश पिंपळे व कृष्णा उर्फ छोट्या  दत्तु पवार यांनी भांडणाची कुरापत काढून दोघांनी घराच्या बाहेर येऊन मोटार सायकल पाडून देत घराचा दरवाजा लाथानी तोडून घरात घुसून झटापट सुरु केली.  सविंद्र पिंपळे यांना मारहाण करीत कृष्णा पवार याच्या जवळील पिस्तुलाने कमलेश पिंपळे याने सविंद्र पिंपळे यांच्या दिशेने गोळी झाडली. त्यावेळी ते खाली वाकल्याने गोळी घरातील फिशपाँटला लागल्याने तो फुटला व मोठा अनर्थ टळला. ही घटना वैशाली हिने घराच्या पाठीमागे जाऊन पोलिसाना कळविल्याने निफाड पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रंगराव सानप व त्यांचे कर्मचारी घटनास्थळी  दाखल होऊन घटनेची माहिती घेऊन कृष्णा दत्तु पवार यास अटक केली. कमलेश सुरेश पिंपळे हा फरार झाला असून त्याचा निफाड पोलीस शोध घेत असून या दोघांवर गुन्हा दाखल केला असून कृष्णा पवार यास निफाड न्यायालयापुढे हजर केले असता त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक रंगराव सानप,हवा.नितीन मंडलिक,मनोज आहेर,त्रंबक पारधे,दिपक पगार करत आहेत .

एक प्रतिक्रिया

  1. बातमी मधील माहिती अर्धवट तर आहेच परंतु सावत्र मुलगी आणि सावत्र वडील हे लिहिण्याची पत्रकाराला काय गरज???त्यांच्यामध्ये कुठलाही सवत्रपणा नसेल पण लेखात तो आवर्जून लिहून लोकांना विषय देण्याची काही गरज नव्हती!

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -