Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक नाशिकरोडला दुर्घटना, ड्रेनेजमध्ये दबले कर्मचारी

नाशिकरोडला दुर्घटना, ड्रेनेजमध्ये दबले कर्मचारी

२० फूट खोल ड्रेनेजमध्ये काम करणारे मजूर ढिगाऱ्याखाली दबले

Related Story

- Advertisement -

विहितगाव-वडनेर दुमाला भागातील माजी नगरसेवक कै. दया काका हांडोरे मार्गावर पालिकेच्या ड्रेनेजचे काम सुरु असताना गुरुवारी (दि.११) दुपारी २० फूट खोल खड्यात दोन कामगारांवर मातीची दरड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. घटनास्थळ नगरसेवक केशव पोरजे यांच्या घरापासून जवळच घटना घडल्याने पोरजेंनी तातडीने घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने मदतकार्य सुरू केले. जेसीबीच्या सहाय्याने मातीच्या ढिगाऱ्याखालून दोघा मजूरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -