घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र‘एफडीए’चे शहरात पुन्हा दोन छापे; शीतपेयासह डार्क चॉकलेटचा साठा केला जप्त

‘एफडीए’चे शहरात पुन्हा दोन छापे; शीतपेयासह डार्क चॉकलेटचा साठा केला जप्त

Subscribe

नाशिक : उन्हाचा पारा वाढत असल्याने नागरिक शीतपेय, फळे, आईसक्रीम, फ्रोझन डेझर्ट, एनर्जी ड्रिंक्स, पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरची मोठया प्रमाणावर खरेदी करत आहेत. मात्र, विक्रेते अधिक नफा मिळवण्यासाठी लेबलदोष व विनापरवाना उत्पादन केल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. अन्न व औषध प्रशासन(एफडीए)च्या पथकाने पंचवटीमध्ये सदोष लेबलच्या २ हजार ९१६ लिटर जप्त केल्या आहेत. तर नवीन नाशिकमध्ये मसल स्ट्रोक न्युट्रीशनमधून पथकाने सदोष लेबल व विनापरवान उत्पादन केलेल्या पिनट बटर असलेल्या डार्क चॉकलेटचा १ हजार ७५० किंमतीचा ७ जार साठा जप्त केला आहे. ‘एफडीए’चे पथक अ‍ॅक्शन मोडवर आल्याने विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

पथकाने २७ एप्रिल रोजी त्रिमूर्ती फूडस अ‍ॅण्ड बेव्हरेजेस, पंचवटी, नाशिक या पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर उत्पादन करणार्‍या पेढीवर छापा टाकला. पथकास या ठिकाणी पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर १ लिटर बॉटल व पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर ५०० मिली बॉटल उत्पादित करीत असल्याचे आढळले. परंतु, त्यांच्या लेबलवर उत्पादनाचे ठिकाण जळगाव असे नमुद केल्याचे आढळले. शिवाय, वेगवेगळे एफएसएसएआय परवाना क्रमांक आढळून आले. अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर यांना बॉटलचा साठा हा प्रथमदर्शनी मिथ्याछाप व सदोष लेबल असल्याचे दिसून आले. पथकाने ५३ हजार ५३० रुपयांचा शिल्लक साठा २ हजार ९१६ लिटर जप्त केला. या प्रकरणी पथकाने नमुने अन्न विश्लेषण प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविले असून, अहवाल येताच पुढील कारवाई केली जाणार आहे.

- Advertisement -

अन्न सुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील यांनी २७ एप्रिल रोजी मसल स्ट्रोक न्युट्रीशन, बडदे नगर, सिडको, नाशिक या ठिकाणी छापा टाकला. या ठिकाणी पथकास उत्पादित केलेले पिनट बटर (डार्क चॉकलेट) चा नमुना घेतला. पथकास १ हजार ७५० किंमतीचा ७ जार शिल्लक साठा सदोष लेबल, विनापरवाना उत्पादन केल्याचे निदर्शनास आले. शिवाय, या ठिकाणी उत्पादनासाठी लागणारे कोणतेही साहित्य नसल्याने भेसळीच्या संशयावरुन पथकाने जप्त केला. पथकाने नमुने अन्न विश्लेषण प्रयोगशाळा येथे विश्लेषणासाठी पाठविले असून, अहवाल येताच पुढील कारवाई केली जाणार आहे. या दोन्ही कारवाया सहआयुक्त संजय नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त मनीष सानप, अमित रासकर, प्रमोद पाटील व अन्न सुरक्षा अधिकारी अविनाश दाभाडे यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -