घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू

नाशिकमध्ये दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू

Subscribe

जखमींवर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू, मृतांत एका कला शिक्षकाचा समावेश

पंचवटी शिवार आणि वाडीवर्‍हे येथे झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर, चार जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहिला अपघात दुचाकीवर नियंत्रण मिळवता न आल्याने झाला आहे तर दुसरा अपघात दुचाकीला पाठीमागून धडक दिल्यामुळे झाला.

अरुण यशवंत शार्दुल (२० रा. फुलेनगर, पंचवटी), शिक्षक शरद काशिनाथ पागेरे (४०) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. सुरज संतोष जाधव (१८, रा. फुलेनगर, पंचवटी) असे जखमीचे नाव आहे. पहिल्या घटनेत आरटीओ कार्यालयाकडून फुलेनगरकडे जात असताना अॅक्टिवा दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने पेठफाटा येथे भरधाव दुचाकी शुक्रवारी (ता. २६) रात्री ९.३० वाजेच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील तीन जण जखमी झाले. जखमींपैकी अरुण यशवंत शार्दुल याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमी दोघांवर जिल्हा रुग्णालयातून प्रथम उपचार करून खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले. जखमींमध्ये सुरज संतोष जाधव याच्यासह त्याच्या एका मित्राचा समावेश आहे.

- Advertisement -

दुसर्‍या घटनेत पाथर्डी फाटा ज्ञानेश्वर नगर येथील शिक्षक शरद काशिनाथ पागेरे (४०) हे वाडीवर्‍हे येथुन पुतणीचा विवाह आटोपून पत्नी व कनिष्ठ मुलासमवेत घरी जात होते. यावेळी त्यांच्या दुचाकीला महामार्गावर पाठीमागून येणार्‍या दुचाकीने धडक दिली. या धडकेत पागेरे व पत्नी, मुलगा रस्त्यावर पडले. पत्नी व मुलगा किरकोळ जखमी झाला. मात्र, पागेरे गंभीर जखमी झाले. त्यांचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ते अभिनव बाळ विकास मंदिर, सिडको येथील संगीत शिक्षक होते. पत्नी व दीड वर्षांच्या मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -