घरमहाराष्ट्रनाशिकदोन नाशिककरांनी पूर्ण केले अर्ध आयर्नमॅन चॅलेंज

दोन नाशिककरांनी पूर्ण केले अर्ध आयर्नमॅन चॅलेंज

Subscribe

गोवा येथे झालेल्या गोवा ट्रायथलॉन स्पर्धा नाशिककर नीता नारंग आणि निलेश झंवर यांनी पूर्ण केली आहे. नीता या बँकिंग प्रोफेशनल म्हणून काम करत असून नाशिक मधील पहिल्या महिला ऑडेक्स क्लब सायकलिंग सुपर रँडोनर आहेत.

गोवा येथे झालेल्या गोवा ट्रायथलॉन स्पर्धा नाशिककर नीता नारंग आणि निलेश झंवर यांनी पूर्ण केली आहे. १.९ किमी समुद्रात पोहणे, ९० किमी सायकलिंग आणि २१ किमी धावणे अशा अर्ध आयर्नमॅन पातळीच्या अंतरामुळे भारतातील सर्वात अवघड अशी ही ट्रायथलॉन समजली जाते.

६१ खेळाडूंचा सहभाग

नीता नारंग यांनी महिलांच्या खुल्या गटातून या स्पर्धेत सहभाग नोंदवत एकूण ८ तास ५४ मिनिट आणि ४१ सेकंद अशी वेळ देताना दुसऱ्या क्रमांकाने तर निलेश झंवर यांनी पुरुषांच्या खुल्या गटातून केवळ ७ तास ३३ मिनिटात स्पर्धा पूर्ण केली. एकूण ६१ खेळाडू यात सहभागी झाले होते.

- Advertisement -

गोवा येथे आयोजित केली गेली स्पर्धा

एन्ड्युरा स्पोर्ट्स क्लब, गोवा यांच्या मार्फत आयोजित होणाऱ्या या स्पर्धेत भारतासह जगभरातून आयर्नमॅन स्पर्धांची तयारी करणारे ट्रायथलिट सहभागी होत असतात. ही समुद्री पाण्यात पोहून पूर्ण करण्याची भारतातील पहिली ११३ किमीची ट्रायथलॉन आहे. वेंगुणीम समुद्र किनाऱ्या जवळ १.९ किमी पोहगोवा विद्यापीठ ते मिरामर अशी ९० किमी सायकलिंग आणि त्याच मार्गावर २१.१ किमीची अर्ध मॅरेथॉन असे अंतर या स्पर्धेत कापायचे असते.

नाशिक मधील पहिल्या महिला

नीता या बँकिंग प्रोफेशनल म्हणून काम करत असून नाशिक मधील पहिल्या महिला ऑडेक्स क्लब सायकलिंग सुपर रँडोनर आहेत. ६०० किमीची ब्रेव्हे त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. नाशिक सायकलिस्टच्या सदस्य असलेल्या नीता यांनी एनसीएफच्या विविध उपक्रमात सहभाग नोंदवला आहे. त्यांनी आजवर भारतातील १८ हून अधिक अर्ध मॅरेथॉन पूर्ण केल्या आहेत. फिटनेस हा उत्तम मानसिक स्थिती आणि चांगले आरोग्य यांचा उत्कृष्ट संगम असल्यावर विश्वास असणाऱ्या नीता पर्यावरणवादी म्हणून शहरात हिरवा पट्टा निर्माण व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत.

- Advertisement -

निलेश झंवर हे व्यवसायाने सनदी लेखापाल असून त्यांनी २ ऑलिम्पिक अंतराच्या २ ट्रायथलॉन पूर्ण केला आहेत. तसेच ६ पूर्ण मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. २००/३००/४००/६०० किमीच्या बीआरएम पूर्ण करताना मागच्याचवर्षी सुपर रँडोनर बनले आहेत. ते आता आयर्नमॅन स्पर्धेची तयारी करत आहेत. तसेच झंवर हे मुंबई नाका ते द्वारका हा रस्ता हिरवा आणि स्वच्छ ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -