घरताज्या घडामोडीनाशकात एकाच दिवशी दोघांच्या आत्महत्या

नाशकात एकाच दिवशी दोघांच्या आत्महत्या

Subscribe

नाशिक शहरात दिवसेंदिवस एकटेपणा, प्रेमभंग, वाढत्या अपेक्षा, छळ व नैराश्यातून आबालवृद्धांमध्ये गळफास व विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याच्या घटनांत वाढ होत आहे. वाढत्या आत्महत्येच्या घटनांमुळे कुटुंबीय व नातेवाईकांमध्ये चितेंचे वातावरण आहे. शहरात शुक्रवारी (दि.१९) एकाच दिवशी दोनजणांनी जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी इंदिरानगर व सातपूर पोलीस ठाण्यांत तक्रारी दाखल झाल्या आहेत. विलास बबन पगारे (२८ रा.इदिरानगर), गौतम शंकर मगर (४२) यांनी आत्महत्या केल्या आहेत.

पहिल्या घटनेत, पांडवलेणी डोंगरावर शुक्रवारी सकाळी २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ही बाब नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृताचे नाव विलास पगारे असल्याचे समोर आले. याप्रकरणी इंदिरनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश भोजने व पंकज हासे करीत आहेत.

- Advertisement -

दुसर्‍या घटनेत, त्र्यंबकेश्वर रोडवरील आयटीआय पुलाजवळील भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोरील कंपाऊंडमधील बाभळीच्या झाडाला गळफास घेतलेल्या तरुणाचा मृतदेह सातपूर पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी उपचारार्थ त्यास जिल्हा रूग्णालयात दाखल केला असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत त्यास मृत घोषित केले. दरम्यान, मृताचे नाव गौतम मगर असल्याचे समोर आले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -