घरताज्या घडामोडीचोरी केल्यानंतर पोलिसांच्या भितीने पळू लागले अन्...

चोरी केल्यानंतर पोलिसांच्या भितीने पळू लागले अन्…

Subscribe

दोघे पोलिसांच्या ताब्यात; राणेनगर येथील घटना

दोन ठिकाणी महिलांची पर्स हिसकावणार्‍या चोरट्यांचा पोलीस पाठलाग करत असताना चोरट्यांच्या भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत एक दुचाकीचालक महिला जखमी झाल्याची घटना गुरूवारी (दि.२१) दुपारी १२ वाजता लक्ष्मी गॅरेजजवळ, राणेनगर येथे घडली. पोलिसांनी दोघांना पाठलाग करत पकडले असून एकजण सिन्नर तालुक्यातील अल्पवयीन मुलगा आहे. याप्रकरणी रवींद्र राजपूत यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
तुषार बारकू गोर्डे (२४, रा. दातेली, ता. सिन्नर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

दीक्षा राजेंद्र खंडेलवाल (२५, रा. राजकिरण अपार्टमेंट, राणेनगर) असे जखमी झालेल्या महिलेचे आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, तुषार गोर्डे चोरी करण्यासाठी विनापरवाना दुचाकी (एमएच १९-डब्ल्यू ६९५३)वरुन अल्पवयीन जोडीदारासोबात गुरुवारी नाशिक शहरात आला. दोघांनी पांडवनगरी ते राजीवनगर परिसरात दोन महिलांच्या हातातील पर्स हिसकावली. राणेनगर अंडरपासकडे जाणार्‍या रोडवर नागरिक व पोलिसांपासून बचाव व्हावा, यासाठी ते दुचाकीवरुन भरधाव वेगाने जात असताना लक्ष्मी गॅरेजच्या गल्लीतून दुचाकीवरुन जात असलेल्या महिलेस धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. ही बाब पोलिसांना समजताच पोलिसांनी दोघांना पाठलाग करत पकडले. त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तुषार गोर्डे यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तर अल्पवयीन मुलाची रवानगी मनमाड येथील बालसुधारगृहात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हुसेन शेख करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -