घरक्राइमदोन पेट्रोलपंप चालकांवर गुन्हा दाखल

दोन पेट्रोलपंप चालकांवर गुन्हा दाखल

Subscribe

वडनेर खाकुर्डी पोलिसांची कारवाई

नाशिक जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर होताना नव्याने प्रतिबंध लागू झालेत. त्यात अत्यावश्यक सेवा तसेच पासधारक वगळता इंधन वाटपास परवानगी नाकारण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मालेगाव मुख्यालयअंतर्गत पहिली कारवाई वडनेर खाकुर्डी पोलिसांनी केली आहेे. दोन पेट्रोलपंप चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या नेतृत्वाखाली लॉकडाऊनच्या अंमलबजावणी केली जात आहे. त्याअंतर्गत पोलिस उपअधीक्षक लता लोंदे यांनी रविवारी दरेगाव नाक्यावर अचानक तपासणी करित विनाकारण फिरणार्‍या वाहनचालकांना दणका दिला होता. तर, सोमवारी वडनेर खाकुर्डी पोलिसांनी हद्दीतील पेट्रोलपंपांची तपासणी केली. त्यात अजंग शिवारातील संतोष पेट्रोलियम व भायगाव शिवारातील बी. एस. पेट्रोलियम या पेट्रोल पंपावर सर्रास पेट्रोल विक्री निदर्शनास आली. त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. येत्या दिवसांत पुन्हा अत्यावश्यक तसेच पासधारकांव्यतिरिक्त अन्य लोकांना इंधन विक्री केल्यास या पेट्रोलपंपांवर सील करण्याची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्‍वर मोताळे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -