घरमहाराष्ट्रनाशिकभरधाव पिकअपची जिपसह बिटमार्शलच्या वाहनास धडक

भरधाव पिकअपची जिपसह बिटमार्शलच्या वाहनास धडक

Subscribe

पेठरोडवर असलेल्या राऊ हॉटेल चौफुलीवर सोमवारी (ता.१) रात्री अकराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन बिटमार्शल पोलीस गंभीर जखमी झाले. दोघांनाही उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, म्हसरूळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेठरोडवर मखमलाबाद पोलीस चौकीजवळ सोमवारी, १ एप्रिलला रात्री बीटमार्शल क्रमांक-१ पोलीस नाईक नंदकिशोर जाधव व राजेंद्र लोखंडे कर्तव्यावर होते. यादरम्यान नाशिकहून पेठरोडला भरगाव वेगाने जाणार्‍या महिंद्रा पिकअप (एमएच १७ बी वाय ९०७०) हिने मखमलाबादकडे जात असलेलल्या टाटा एस जिपला (एमएच १५ एफव्ही १३५३) जोरदार धडक दिली. यात पिकअपचालकाचे नियंत्रण सुटून हे वाहन राऊ चौफुलीवर कर्तव्यावर असलेल्या पोलीस नाईक जाधव व लोखंडे यांच्या वाहनावर जाऊन आदळले. यात दोन्ही पोलीस कर्मचार्‍यांना गंभीर दुखापत झाली. तसेच बिट मार्शल दुचाकी (क्रमांक एमएच १५ ईए ०२६४) हिचे मोठे नुकसान झाले. टाटा एसचा चालकही जखमी आहे. जखमींना खासगीत दाखल करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -