घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रPWD : स्वतःच्याच सहकाऱ्याकडे मागितली लाच, दोघांना अटक

PWD : स्वतःच्याच सहकाऱ्याकडे मागितली लाच, दोघांना अटक

Subscribe

सार्वजनिक बांधकाम विभाग, उत्तर विभाग कार्यालयातील दोन लिपिकांना केली अटक

रजेच्या फरकाचे बिल व इतर बिलांचे काम करुन देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि.२३) अटक केली. विशेष म्हणजे स्वतःच्याच विभागातील निवृत्त सहकाऱ्याकडे या दोघांनी लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग, उत्तर विभाग कार्यालय, नाशिक येथील मुख्य लिपीक प्रवीण नामदेव पिंगळे आणि वरिष्ठ लिपीक लता शांताराम लहाने अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

तक्रारदार कर्मचारी हे ३० जुलै २०२१ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचे सेवा पुस्तक पडताळणी, रजेच्या फरकाचे बिल व इतर बिलांचे काम प्रलंबित होते. हे काम करुन देण्यासाठी दोघा लाचखोरांनी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने सापळा रचला आणि गुरुवारी (दि.२३) बांधकाम विभागाच्या कार्यालयात १० हजार रुपयांची लाच स्विकारताना दोघांना अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -